PCB Former Chief Ramiz Raja Angry Remarks: भारतात सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 मधून पराभूत होऊन पाकिस्तानी संघ बाहेर पडला आहे. ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान लीग टप्प्यात स्पर्धेतून बाहेर पडला. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा लाजिरवाणा खेळ पाहून पाकिस्तान संघ आणि कर्णधार बाबर आझमवर बरीच टीका होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबर आझमला कर्णधारपदावरूनही काढले जाऊ शकते. तर माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी या पराभवासाठी पीसीबीला फटकारले आहे.

दोन वर्षे पीसीबीचे अध्यक्ष म्हणून काम केलेल्या रमीझ यांनी खेळाडूंना दोष देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी पाकिस्तान क्रिकेटच्या पतनासाठी बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कडवी टीका केली आहे. रमीझ राजा आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाले की, “जेव्हा गोलंदाज नवीन चेंडूने विकेट घेण्यास असमर्थ ठरतात आणि अधिकाधिक धावा देऊन संघाला अडचणीत आणतात तेव्हा बाबर कर्णधारपदी अजून काय करेल? असं होऊनही पीसीबी फार फार तर चर्चा करून बोर्डाचा प्रभारी बदलावा, प्रशिक्षक टीम बदलावी, कर्णधार बदलावा एवढंच काय ते योगदान देतं याने त्यांना वाटतं की आपण फार मोठं पाऊल उचललं आहे. पण हा गैरसमज आहे.”

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

“बोर्डालाच खेळाची आवड नसेल तर पाकिस्तानचे क्रिकेट कणभरही सुधारू शकत नाही. तुम्हाला स्वतः तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या पत्रकारांना बातम्या देण्याची ही प्रक्रिया बंद करण्याची गरज आहे. यांनी क्रिकेटची *** (वाट लावली आहे)” .

पुढे पाकिस्तानच्या निवड समितीला सुनावताना रमीझ राजा म्हणाले की, “तुम्ही नियुक्त केलेला नवीन मुख्य निवडकर्ता, त्याच्या जुन्या क्लिप पहा आणि तो बाबर [आझम] आणि [मोहम्मद] रिझवानबद्दल किती वाईट बोलला आहे, तुम्हाला ७० वर्षीय व्यक्तीची नियुक्ती करून क्रिकेटची प्रगती करायची आहे ज्याला निवडीबद्दल काहीच माहित नाही. “

हे ही वाचा<< पाकिस्तान व इंग्लंडने वर्ल्डकप मध्ये कमावलेली रक्कम ऐकून व्हाल चकित! स्पर्धा गेली, पण दोघांचीही चांदी

“पाकिस्तान क्रिकेट कोलमडले आहे. तुम्ही क्लबच्या सामन्यांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करून प्रगती करू शकत नाही. आणि ही मैदाने सुद्धा सुट्ट्यांच्या दिवशी विविध कंपन्यांना टेनिस-बॉल क्रिकेट आयोजित करण्यासाठी दिली जातात कारण ते त्यांना पैसे देतात. ही संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे आणि मंडळाने आधी स्वतःला बदलायला हवे,” असे त्यांनी शेवटी सांगितले.”

Story img Loader