Pakistani players’ salary increased: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या टॉप खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला. बोर्डाने खेळाडूंच्या मानधनात ऐतिहासिक वाढ केली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या माहिती नुसार, पीसीबीचा वार्षिक करार जूनमध्ये संपला. नवीन वर्षासह पीसीबीच्या अ श्रेणीतील खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे.

पीसीबीने वाढवला खेळाडूंचा पगार –

पीसीबीच्या टॉप श्रेणीत तीन खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आहे. नवीन वर्षापासून या खेळाडूंना १५९०० डॉलर्स म्हणजेच सुमारे १३ लाख रुपये दरमहा दिले जातील. म्हणजेच या खेळाडूंना वर्षाला दीड कोटी रुपये मिळतील. याआधी त्यांना दरमहा ४७०० डॉलर्स म्हणजेच वार्षिक ४६ लाख रुपये मिळत होते.

भारतीय खेळाडूच्या तुलनेत खूपच मागे –

A+ या सर्वोच्च श्रेणीत भारताच्या टॉप ४ खेळाडू सामील आहेत. या श्रेणीत, तिन्ही फॉरमॅटचा भाग असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. सध्याच्या करारानुसार, A+ श्रेणीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. बीसीसीआय A+ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये देते. हे वेतन पाकिस्तानच्या खेळाडूंच्या तुलनेत खूप जास्त आहे.

हेही वाचा – County Cricket : पृथ्वी शॉ पहिल्याच बॉलवर पुल शॉट मारायला गेला, अन् थेट स्टंपवर…, VIDEO होतोय व्हायरल

त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू करोडपती झाले आहेत, पण तरीही ते भारतीय खेळाडूंपेक्षा खूप मागे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना माहित आहे की पाक खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे उत्पन्न इतर देशांतील खेळाडूंच्या तुलनेत कमी आहे. आयपीएल ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे, त्यात खेळणारे विदेशी खेळाडूही करोडो रुपये कमावतात पण आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे.

हेही वाचा – Sanju Samson: “त्याचे आकडे कोणत्याही फलंदाजीच्या क्रमांकावर योग्य नाहीत”; सॅमसनबद्दल माजी खेळाडूच मोठं वक्तव्य

मागील करार संपल्यापासून खेळाडू पीसीबीला पगार वाढवण्याची मागणी करत होते. त्याचे कारण म्हणजे इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत पगार कमी आहे. त्यामुळे पीसीबाने आपल्या अव्वल खेळाडूंच्या पगारात ४ पट वाढ केली आहे. आशिया कपपूर्वी पीसीबी पगार वाढ करत आपल्या खेळाडूंना आनंदाची बातमी दिली आहे. पगाराच्या बाबतीतही इंग्लंडचे खेळाडू भारतापेक्षा पुढे आहेत. तेथे अव्वल दर्जाच्या खेळाडूंना दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये दिले जातात.

Story img Loader