Pakistan launches new jersey for World Cup 2023: विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे सोमवारी अनावरण करण्यात आले. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ विश्वचषकादरम्यान नव्या जर्सीत दिसणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केले फोटो –

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, शादाब खान आणि मोहम्मद नसीम यांचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय पाकिस्तानी महिला संघाच्या कर्णधारासह अनेक खेळाडू दिसत आहेत. या फोटोमध्ये या खेळाडूंनी पाकिस्तानची नवी जर्सी घातली आहे. पाकिस्तान संघाची जर्सी खूपच आकर्षक दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांच्या हस्ते पाकिस्तान संघाची नवीन जर्सी प्रसिद्ध करण्यात आली.

सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. ही पाकिस्तान जर्सी पीसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे आणि पाकिस्तान संघाचे चाहते वेबसाइटवरून ती खरेदी करू शकतात. वर्ल्ड कप २०२३ साठी जर्सी लाँच करणारा पाकिस्तान हा पहिला संघ आहे. आतापर्यंत या मेगा इव्हेंटसाठी इतर कोणत्याही संघाने आपली जर्सी लॉन्च केलेली नाही.

हेही वाचा – Rohit Sharma: “२०११ मध्ये जेव्हा माझी निवड झाली नव्हती, तेव्हा…”, विश्वचषकाबद्दल बोलताना रोहितने सांगितला भावनिक किस्सा

अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ येणार आमनेसामने –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. याआधी ४ ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ खेळणार आहेत. त्याचबरोबर याआधी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी होणार आहे. तत्पुर्वी, आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळचे संघ आमनेसामने असतील.

हेही वाचा – Asia Cup 2023: विराट कोहलीसोबत पंगा घेणारा नवीन-उल-हक अफगाणिस्तान संघातून झाला बाहेर, इन्स्टावर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

२०२३ च्या विश्वचषकातील पाकिस्तानचे वेळापत्रक:

६ ऑक्टोबर – नेदरलँड – हैदराबाद
१० ऑक्टोबर – श्रीलंका – हैदराबाद
१४ ऑक्टोबर – भारत – अहमदाबाद
२० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया – बंगळुरू
२३ ऑक्टोबर – अफगाणिस्तान – चेन्न
२७ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका – चेन्नई
३१ ऑक्टोबर – बांगलादेश – कोलकाता
४ नोव्हेंबर – न्यूझीलंड – बंगळुरू
११ नोव्हेंबर – इंग्लंड – कोलकाता

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb has launched pakistan teams new jersey for world cup 2023 vbm
Show comments