PCB has shared a video of Shaheen Afridi and Jasprit Bumrah: रविवारी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. परंतु, आता पुढचा सामना उद्या (सोमवार) राखीव दिवशी होणार आहे. दरम्यान या सामन्यातील जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीचा एक व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.

हा सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहला पिता बनल्याबद्दल अभिनंदन करताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाहीन बुमराहचे अभिनंदन करताना तसेच त्याला भेटवस्तू देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये शाहीनला असे म्हणताना ऐकू येते की, “अल्लाह त्याला सुखी ठेवो. अल्लाह त्याला दुसरा बुमराह बनू दे.” याला उत्तर देताना बुमराह म्हणतो, “खूप खूप धन्यवाद.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ गडी गमावून १४७ धावा केल्या. सध्या केएल राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा काढून नाबाद आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे.

हेही वाचा – IND vs PAK: मैदान सुकवण्यासाठी चक्क लावले पंखे; ग्राऊंड स्टाफचा देसी जुगाड!

तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे तुफान पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली. त्याने कर्णधार रोहितला बाद केले. हिटमॅनने आपले ५० वे अर्धशतक झळकावले. त्याने बाद होण्यापूर्वी ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. त्याचवेळी शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला.

Story img Loader