वृत्तसंस्था, कराची

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनाचा गुंता अधिकच वाढताना दिसत असून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच खेळविण्यावर ‘पीसीबी’ ठाम असून संमिश्र प्रारूप आराखडा (हायब्रिड मॉडेल) आपल्याला अस्वीकारार्ह असल्याचे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळविले आहे.

भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
PCB confident about stadium renovation assures that preparations for Champions Trophy are on track
स्टेडियम नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ निश्चिंत; चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा
arvind kejriwal hindutva
विश्लेषण : पुजाऱ्यांना मानधन जाहीर करून केजरीवालांचा भाजपला शह? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नवा संघर्ष?

‘आयसीसी’ची शुक्रवारी बैठक होणार असून यात विशेषत: चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाचा तिढा सोडविण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. ही बैठक आभासी पद्धतीने होणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानात नियोजित आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा संमिश्र प्रारूपात खेळविण्याबाबत ‘आयसीसी’ला विचार करावा लागत आहे. यानुसार, भारताचे सामने अन्यत्र होतील आणि अन्य सर्व संघांचे सामने पाकिस्तानात खेळवले जातील. मात्र, संमिश्र प्रारूप आराखडा स्वीकारण्यास ‘पीसीबी’ तयार नाही. ‘‘पीसीबीने काही तासांपूर्वीच ‘आयसीसी’शी संपर्क केला आणि संमिश्र प्रारूप आराखडा आम्हाला अस्वीकारार्ह असल्याचे कळविले’’, असे सूत्राकडून गुरुवारी सांगण्यात आले.

हेही वाचा >>>IND vs AUS: काय? विराट कोहलीच्या बॅगमध्ये कुऱ्हाड, तलवारी अन् ढाल, VIDEO होतोय व्हायरल

‘‘पीसीबीने सुरुवातीला संमिश्र प्रारूप आराखड्याचा विचार केला होता. मात्र, त्यांची एक अट होती. आताची स्पर्धा अशा पद्धतीने झाली, तर २०३१ सालापर्यंत भारतात होणाऱ्या ‘आयसीसी’च्या स्पर्धांसाठीही हा नियम लागू झाला पाहिजे. म्हणजेच भारतात होणाऱ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघाचे सामने अन्य एखाद्या देशात खेळवले जातील,’’ असे सूत्राने सांगितले. आगामी काळात भारताकडे आशिया चषक (२०२५), महिला विश्वचषक (२०२५) आणि पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२६, सह-यजमान) या स्पर्धांचे यजमानपद आहे.

तसेच अन्य एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने आपल्या क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाण्यास मंजुरी दिली नसेल, तर तसे अधिकृत पत्र ‘बीसीसीआय’कडून आपल्याला मिळाले आहे हे ‘आयसीसी’ने दाखवावे अशी ‘पीसीबी’ची मागणी आहे. ‘‘आयसीसीच्या नियमांनुसार, एखाद्या संघाला त्यांच्या देशाच्या सरकारने कोणत्याही कारणास्तव अन्य एखाद्या देशात जाण्यास नकार दिला असेल, तर तसे लेखी पत्र ‘आयसीसी’ला सूपूर्द करावे लागते. मात्र, अद्याप तसे झालेले नाही’’, असे सूत्राकडून सांगण्यात आले.

‘आयसीसी’च्या महसुलात ‘बीसीसीआय’ आणि भारतीय संघाचे मोठे योगदान आहे याची आपल्याला कल्पना असल्याचे ‘पीसीबी’ने म्हटले आहे. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानचे योगदानही विसरता येणार नाही आणि गेल्या काही ‘आयसीसी’च्या स्पर्धांत भारत-पाकिस्तान सामन्यांतूनच मोठा महसूल मिळाला हेसुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे ‘पीसीबी’ला वाटते.

हेही वाचा >>>SA vs SL Test: ४७ वर ऑल आऊट! श्रीलंकेची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या, मार्को यान्सनची जादुई गोलंदाजी

याच मुद्द्याला धरून ‘आयसीसी’चे सदस्यही ‘पीसीबी’ची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याविना चॅम्पियन्स करंडकाची भव्यता कमी होईल आणि याचा मोठा आर्थिक फटकाही बसेल, अशी ‘आयसीसी’ची धारणा आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक अजूनही जाहीर न करण्यात आल्याने या स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या ‘जिओ स्टार’ने आपली नाराजी ‘आयसीसी’ला कळविली आहे. वेळापत्रक हे स्पर्धेच्या ९० दिवस आधी दिले जाणे अपेक्षित असते. मात्र, तसे झालेले नाही.

तीन पर्यायांचा विचार?

● चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनाचा तिढा सोडविण्यासाठी तीन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. पहिला पर्याय म्हणजे संमिश्र प्रारूप आराखडा. यानुसार, बहुतेक सामने पाकिस्तानात होतील आणि भारताचे सामने अन्यत्र खेळवले जातील.

● दुसरा पर्याय म्हणजे, संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानाबाहेर खेळवली जाईल. मात्र, आयोजनाचे हक्क पाकिस्तानकडे राहतील.

● तिसऱ्या पर्यायानुसार, संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात होईल, पण त्यात भारताचा सहभाग नसेल. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यांचे महत्त्व लक्षात घेता हा पर्याय स्वीकारला जाण्याची शक्यता कमी आहे.

पाकिस्तानचा संघ भारतात जाऊन खेळतो, पण भारत सरकार त्यांचा संघ पाकिस्तानात पाठवत नाही, हे योग्य आहे का? आम्हाला संमिश्र प्रारूप आराखडा मान्य नाही. शुक्रवारी होणाऱ्या ‘आयसीसी’च्या बैठकीत यावर तोडगा निघेल याची मला खात्री वाटते. जय शहा डिसेंबरपासून ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ते आता ‘बीसीसीआय’मधून ‘आयसीसी’त जाणार आहे. ते केवळ ‘आयसीसी’च्या हिताचा विचार करतील अशी मला आशा आहे. – मोहसीन नक्वीअध्यक्ष, पाकिस्तान क्रिकेट मंडळ.

Story img Loader