Pakistan Cricket Controversy: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी संघांना त्यांच्या देशात खेळायचे नसते तर कधी त्यांच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये चर्चेचा विषय बनतात. पाकिस्तानी खेळाडू रोज नवे वाद निर्माण करून जे काही उरलीसुरली इज्जत आहे ती घालवत आहेत आणि तोंडावर आपटत आहेत. ताज्या वृत्तानुसार, पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ निर्माण झाला असून यावेळी हा वाद खेळाडूंच्या पगाराशी संबंधित आहे, ज्यावर खेळाडूही ठाम आहेत. खेळाडूंनी यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

जगभरातील क्रिकेटपटू विविध फ्रँचायझी टी२० टूर्नामेंटमध्ये खेळून भरपूर पैसे कमवत आहेत, विशेषत: आयपीएलमध्ये जेथे पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश नाही. त्याचबरोबर आता फक्त बीसीसीआयच नाही तर जगातील इतर सर्व क्रिकेट बोर्डही आपल्या खेळाडूंना चांगला पगार देत आहेत. पण पाकिस्तान क्रिकेटमधली परिस्थिती तशीच आहे, पगार इतका कमी आहे की, खेळाडू वेळोवेळी बंडखोरी करत असतात.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या कृतीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी संतापला; म्हणाला, “हे जरा अतीच झालं…”

‘क्रिकेट पाकिस्तान’मध्ये नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानी क्रिकेटपटू पीसीबीच्या आगामी केंद्रीय करारावर खूश नाहीत. त्यांना दिले जाणारे वेतन तुटपुंजे आहे आणि खेळाडू इतके संतापले आहेत की, त्यांनी केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यासह नकार दिला आहे. सध्या पाकिस्तानी संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेतून परतल्यावर पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांच्याशी बोलणार आहे. माहितीसाठी की, पाकिस्तानी खेळाडूंचा पूर्वीचा करार ३० जून रोजी संपला आहे, म्हणजेच करारबाह्य होऊनही ते श्रीलंकेत खेळत आहेत.

या अहवालानुसार, पाकिस्तानमधील खेळाडूंना इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एकीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने आपल्या खेळाडूंकडून ग्लोबल टी२० कॅनडा स्पर्धेत खेळण्यासाठी $ २५,००० ची मागणी केली आहे, तर त्यांचे वेतन फक्त $ ५,००० आहे. त्यामानाने बीसीसीआयचे वार्षिक करारातील वेतन श्रेणीतील रक्कम खूप जास्त आहे.

हेही वाचा: Syazrul Idrus: सियाजरुल इद्रासने रचला इतिहास! टी२० क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेत मोडला भारताच्या ‘या’ खेळाडूचा विक्रम

श्रीलंकेतून परतल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू पीसीबी प्रमुखांना भेटतील आणि अनेक मुख्य मुद्द्यांवर चर्चा करतील, असे सांगण्यात येत आहे. खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याची, तसेच स्वत:चा आणि कुटुंबाचा विमा काढण्याची मागणी ते त्यांच्याकडे करणार आहेत. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धोरण आणि आयसीसी इव्हेंटमधून मिळणाऱ्या कमाईत वाटा देण्याची मागणीही करण्यात येणार आहे. जर यासर्व अटी मान्य न झाल्यास आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकपमध्ये आम्ही खेळणार नाही, असेही ते म्हणाले.