PCB Chief Selector: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कसोटी कर्णधार इंझमाम-उल-हक आशिया कप २०२३ आणि विश्वचषक २०२३ च्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून परतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर ट्वीट करून माहिती दिली आहे की, पुन्हा एकदा इंझमाम-उल-हकची राष्ट्रीय पुरुष संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंझमामने यापूर्वी २०१६ ते २०१९ पर्यंत हे पद भूषवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान क्रिकेट संघाला आशिया कप २०२३ आणि विश्वचषक २०२३ सारख्या दोन मोठ्या टूर्नामेंट खेळायच्या आहेत, त्यामुळे संघाला एका उत्तम निवडकर्त्याची गरज होती. पीसीबीने ही जबाबदारी माजी कर्णधार इंझमाम-उल-हककडे सोपवली असून आता हा माजी कर्णधार आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपला राष्ट्रीय क्रिकेट संघ निवडणार आहे. भारतात होणारा विश्वचषक संघासाठी खूप महत्त्वाचा असल्याकारणाने पीसीबीने इंझमामची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

काही काळापूर्वी पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले होते की ” नवीन निवड समितीसाठी मिस्बाह-उल-हक, इंझमाम आणि मुहम्मद हफीझ या खेळाडूंच्या पर्यायावर क्रिकेट तांत्रिक समितीचे सदस्य चर्चा करत होते. तसेच आर्थर आणि ब्रॅडबर्न या खेळाडूंचा त्यात समावेश केला जाईल की नाही हे अद्याप ठरलेले नव्हते. त्यांचा सदस्यत्वासाठी विचार करायचा की नाही यावर बाबर आझमचे मत घेतले जाणार होते आणि त्यानंतरच क्रिकेट तांत्रिक समिती अध्यक्षपदासाठीची शिफारस करणार होती.”

इंझमाम-उल-हकची क्रिकेट कारकीर्द

इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्याने अनेक अटीतटीच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर त्याने १२० कसोटी सामन्यांच्या २०० डावांमध्ये ४९.६ च्या सरासरीने ८८३० धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर २५ शतके आणि ४६ अर्धशतके आहेत. त्याने एकदा कसोटीत ३३९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Babar Azam: वर्ल्डकपआधी पाकिस्तानी कर्णधार आला फॉर्मात; बाबरने शतक ठोकत रचला इतिहास, गेलचा मोडला विक्रम

त्याचबरोबर कसोटीशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ३७८ सामन्यांच्या ३५० डावांमध्ये ३९.५ च्या सरासरीने ११७३९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने झळकावलेल्या १० शतके आणि ८३ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची एकूण ३५ शतके आहेत. मात्र, जेव्हा त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला जातो, तेव्हा इंझमामने फक्त एक टी२० सामना खेळला आहे कारण टी२० फॉरमॅटची ओळख करून देण्याच्या वेळेपर्यंत तो निवृत्त होण्याच्या तयारीत होता. त्याने एका टी२० मध्ये केवळ ११ नाबाद धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb prepares hard before asia cup as they entrusted former captain inzamam ul haq as a chief selector for their team avw