PCB seeks written assurance from BCCI: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात होणार आहे. त्यामुळे पीसीबीने आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी बीसीसीआय समोर एक अट ठेवली आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून लेखी हमी हवी आहे, की २०२५ मध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत सहभागी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी ५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी, बीसीसीआयने अहमदाबाद (भारत विरुद्धचा सामना), चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांना पाकिस्तानच्या सामन्यांसाठी संभाव्य यजमान म्हणून निवडले आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखालील एसीसीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’ची पुष्टी केली नाही. ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये, भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल, तर पाकिस्तान इतर सामने आयोजित करेल.

नजम सेठी दुबईत एसीसी अधिकाऱ्यांना भेटू शकतात –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नजम सेठी ८ मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते एसीसी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईच्या भेटीदरम्यान सेठी पाकिस्तानच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू करतील अशी अपेक्षा आहे. २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसी पाकिस्तानला येण्याची लेखी हमी देत ​​नाही, तोपर्यंत ते भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळणार नाहीत.

हेही वाचा – DC vs RCB: सलग तीन चेंडूवर षटकार-चौकार मारल्याने सॉल्टवर भडकला सिराज; सामन्यानंतर मारली मिठी, पाहा VIDEO

नजम यांनी सरकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली –

सूत्राने सांगितले की, नजम सेठी यांनी नुकतीच काही सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून सल्लाही घेतला की जर आशिया कप लाहोर आणि दुबईमध्ये आयोजित केला गेला नाही, तर पीसीबीने आपल्या हायब्रीड मॉडेल योजनेअंतर्गत एसीसीला प्रस्ताव दिल्याप्रमाणे पाकिस्तानने आशिया कपमध्ये खेळावे का? ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये आशिया चषक आयोजित करण्याबाबत एसीसी सदस्यांना ठोस आणि स्पष्ट भूमिका देण्यासाठी सेठी यांना सरकारकडून संमती मिळाली आहे.

हेही वाचा – Saachi Marwah: नितीश राणाच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

आशिया चषकाबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेठी यांनी एसीसी सदस्यांना हे स्पष्ट करणे अपेक्षित आहे, की एकतर त्यांनी पाकिस्तानचा हायब्रीड प्रस्ताव स्वीकारला किंवा टूर्नामेंट पाकिस्तानमधून बाहेर काढली, तर पीसीबी यावर्षी स्पर्धेत भाग घेणार नाही. पीसीबी अध्यक्ष आशिया कपच्या वेळापत्रकात आणखी विलंब स्वीकारण्यास तयार नाहीत. नजम सेठी यांना आता हे समजले आहे की, आता काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ते आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण आणि वेळापत्रक निश्चित करण्यात एसीसीकडून आणखी विलंब स्वीकारण्यास तयार नाहीत. आशिया चषकाचे सामने पाकिस्तानात न झाल्यास पाकिस्तान संघ आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही, अशी सेठी यांची भूमिका आता स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb says bcci should guarantee paks participation in champions trophy so we will go to india for the world cup vbm