PCB stop Womens ODI tournament due to hotel fire : टीम हॉटेलमध्ये आग लागल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कराचीमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धा अचानक थांबवावी लागली आहे. ज्यामध्ये पाच खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. या आगीनंतर पाकिस्तानात खळबळ प्रचंड उडाली आहे. पीसीबीने पाच प्रतिस्पर्धी संघ आणि संघाच्या अधिकाऱ्यांसाठी संपूर्ण मजला बुक केला होता. आग लागली तेव्हा बहुतांश खेळाडू हॉटेलबाहेर होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे पाकिस्तानच्या व्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, आग लागली तेव्हा पाच खेळाडू वगळता सर्व क्रिकेटपटू आणि अधिकारी सामन्यात किंवा नेट सेशनसाठी नॅशनल स्टेडियमवर होते. खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये असलेल्या पाच खेळाडूंना पीसीबीने ताबडतोब बाहेर काढले. त्यांना हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये सुरक्षितपणे हलवले म्हणून कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही.

Fire at Hospital in Tamil Nadu
Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
massive fire breaks out at bamboo godown in vasai
कामणच्या बेलकडी येथे बांबूच्या गोदामाला भीषण आग; वसईत अवघ्या तीन तासात दुसरी आग दुर्घटना
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
fire godown Pimpri-Chinchwad, Massive fire at godown,
पिंपरी-चिंचवडमध्ये गोडाऊनला भीषण आग; धुरांचे लोट काही किलोमीटर..
fire broke out Bavdhan area, Bavdhan area fire,
पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक

गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये रंगणार अंतिम सामना –

पीसीबीने खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत स्पर्धा मध्यंतरी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पीसीबीला कोणत्याही हॉटेलमध्ये १०० खोल्याही मिळत नाहीत, ज्या आवश्यक सुविधांनुसार आहेत. आता राष्ट्रीय महिला एकदिवसीय स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी, पीसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की इनव्हिन्सिबल्स आणि स्टार्स हे पॉइंट टेबलमध्ये टॉप-२ संघ आहेत. हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळणार आहेत. अंतिम फेरीची तारीख आणि ठिकाण योग्य वेळी जाहीर केले जाईल.

पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित –

या घटनेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाच्या पाकिस्तानच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ८ संघांचा सहभाग असणार आहे, त्यापैकी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही पण उर्वरित संघांना त्यांचे सामने तिथे खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी कराचीसह तीन पाकिस्तानी स्टेडियमची पुनर्बांधणी केली जात आहे, पण त्यालाही बराच वेळ लागेल. या सगळ्यामध्ये ही घटना पीसीबीसाठी अडचणी निर्माण करते. अशा तयारीने पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader