कराची : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील केंद्रांची चाचपणी करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरक्षा पथक पाठवले जाणार आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच पाकिस्तान सरकारकडून राष्ट्रीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता हिरवा कंदील देण्यात येईल.

ईदच्या सुट्टीनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकाचे सामने ज्या स्टेडियममध्ये होणार आहेत, तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवण्यात येईल. मात्र, हे पथक कधी पाठवायचे याचा निर्णय सरकारसह परराष्ट्र आणि गृहमंत्रालय घेईल, असे आंतर-प्रांतीय समन्वय (क्रीडा) मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे

‘‘एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने ज्या केंद्रांवर होणार आहे, तेथील सुरक्षा आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ‘पीसीबी’चे पथक भारतात जाईल,’’ असे या सूत्राकडून सांगण्यात आले. हे पथक अहमदाबाद, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद आणि कोलकाता येथील केंद्रांची चाचपणी करेल. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

‘‘भारतामध्ये आपला संघ पाठवण्यापूर्वी क्रिकेट मंडळाला सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. मग सरकारकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतामध्ये पथक पाठवले जाते. ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. हे पथक तेथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. तसेच त्यांच्यासह सामने ज्या ठिकाणी होणार आहेत, तेथे जाऊन सुरक्षा आणि अन्य व्यवस्थेची चाचपणी करेल,’’ असेही या सूत्राने सांगितले.

या पथकाला ज्या केंद्रांवर सामने होणार आहेत, तेथील सुरक्षेबाबत पूर्ण खात्री नसल्यास तसे ते आपल्या अहवालात नमूद करतील.