Multan stadium empty for Pakistan vs Nepal match in Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ ची सुरुवात आजपासून घरचा संघ पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने झाली आहे. मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानसाठी आजचा दिवस मोठा आहे, कारण १५ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र, सामन्यादरम्यान मुलतान क्रिकेट स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. असे म्हणता येईल की संपूर्ण स्टेडियम रिकामे दिसते. एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये स्टेडियममधील खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अनेक वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहे, पण प्रेक्षकांची संख्या नगण्य आहे.

यजमान संघाने प्रेक्षकांच्या संख्येचा अधिकृत आकडा अद्याप शेअर केलेला नाही, परंतु सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये स्टेडियम रिकामे दिसत आहे. त्यामुळे चाहते त्यांनी ट्रोल करत आहे. सामन्याबद्दल बोलायचे तर, पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२ षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. सध्या अहमद (८) आणि बाबर (७०) खेळपट्टीवर आहेत. मोहम्मद रिझवान ४४ धावांवर बाद झाला. अवघ्या सहा धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. नेपाळ संघाकडून करण आणि संदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच नेपाळने रचला इतिहास, ‘या’ देशांच्या यादीत झाला सामील

सोशल मीडियावर चाहत्यांनी घेतली पाकिस्तानची मजा –

सोशल मीडिया चाहते सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय चाहते स्टेडियमचे फोटो शेअर करत आहेत. उल्लेखनीय आहे की आशिया कप २०२३ च्या पहिल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान आहे. भारतीय संघ २ सप्टेंबरला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर पाकिस्तानचा संघ असणार आहे.