फुटबॉल दिग्गज पेलेंना इंडियन सुपर लीग स्पर्धेतील अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाच्या ‘फटाफटी फुटबॉल’ तंत्राने भुरळ घातली आहे. हे तंत्र नक्की काय आहे, हे अनुभवण्यासाठी पेले स्वत: अ‍ॅटलेटिको संघाच्या आयएसएलच्या दुसऱ्या हंगामातील सलामीच्या लढतीसाठी उपस्थित राहणार आहेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून पेले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अ‍ॅटलेटिकोच्या सलामीच्या लढतीला उपस्थित राहता येणार आहे याचा आनंद आहे. सॉल्ट लेक स्टेडियमवर दोन्ही संघ आणि चाहत्यांना भेटायला मिळेल. ‘फटाफटी फुटबॉल’ अशा शब्दांत पेले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तब्बल ३८ वर्षांनंतर पेले कोलकाता शहराला भेट देणार आहेत.
‘‘पेले कोलकाता शहरात दोन दिवस असणार आहेत. दोन्ही दिवस त्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. अ‍ॅटलेटिकोच्या सलामीच्या लढतीला संपूर्ण वेळ ते उपस्थित राहणार आहेत,’’ असे अ‍ॅटलेटिको संघाचे मालक गोएंका यांनी सांगितले.

Story img Loader