ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पेले यांच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पाठीच्या दुखण्यामुळे पेले यांना फुप्फुसांमध्ये तसेच उजव्या पायामध्ये त्रास जाणवत होता, म्हणूनच डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी ही शस्त्रक्रिया होणार होती, मात्र अन्य आजारांमुळे ही शस्त्रक्रिया वर्षभर पुढे ढकलण्यात आली. तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझील संघाचा ते भाग होते. मूत्रपिंडाच्या विकाराने ते त्रस्त होते. त्यांची एक किडनी काढण्यात आली होती. खेळत असताना बरगडय़ांना झालेल्या दुखापतींवर डायलिसिसद्वारे उपचार करावे लागले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मांडीच्या हाडाला दुखापत झाली होती.

Story img Loader