ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून त्यांना येत्या काही दिवसांत रुग्णालयामधून घरी सोडण्यात येणार असल्याचे असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
पेले यांच्या मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर पेले यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना अल्बर्ट आइन्स्टाइन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.
इस्पितळाने त्यांच्या पत्रकामध्ये पेले यांना खास काळजी घेणाऱ्या विभागात हलवण्यात आल्याचे म्हटले असले तरी पेले यांच्या प्रवक्त्याने ही गोष्ट नाकारली आहे.
‘‘पेले यांची प्रकृती उत्तम आहे; पण त्यांना फार मोठय़ा प्रमाणात माणसे भेटायला येत असल्यामुळे त्यांच्या प्रकृती सुधारणेला वेळ लागत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातील शांत ठिकाणी हलवण्यात आले आहे, जेणेकरून पेले यांना अधिक विश्रांती घेता येईल,’’ असे पेले यांचे प्रवक्ते जोस रॉड्रिगेझ यांनी सांगितले.
या संधीचा फायदा घेत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, माझी तब्येत ठीक आहे. मला रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. मला विश्रांती मिळावी, यासाठी रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे. मला तुमच्याकडून भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. माझी प्रकृती गंभीर नसून रुग्णालयातून बाहेर आल्यावर कुटुंबीयांसह वेळ व्यतीत करण्याचा माझा प्रयत्न असेल.
– पेले, ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा