अव्वल मानांकित चीनच्या पेंग शुआई आणि तैवानच्या सेइह स्यु वेई जोडीने फ्रेंच खुल्या स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीने सारा इराणी-रॉबर्टा व्हिन्सी जोडीवर ६-४, ६-१ अशी मात केली. या स्पर्धेचे या जोडीचे हे दुसरे जेतेपद आहे. पहिल्या सेटमध्ये इटलीच्या जोडीने ३-१ अशी आघाडी मिळवली होती, मात्र इराणीची सव्‍‌र्हिस तीन वेळा भेदत पेंग-सेइह जोडीने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पेंग-सेइह जोडीने सलग सहा गुणांची कमाई करत आगेकूच केली. गेल्या वर्षी विम्बल्डन आणि वर्षअखेरीस होणाऱ्या डब्ल्यूटीए अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपदही याच जोडीने पटकावले होते. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी पेंग चीनची पहिली महिला खेळाडू ठरली होती.

Story img Loader