पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने छक्का मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, भारताच्या विजयानंतर अनेक ठिकाणी फटाके फोडत गणपतीआधीच दिवाळी साजरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> हार्दिकचीच चर्चा सर्वाधिक! पाकिस्तानला नमवल्यानंतर दिनेश कार्तिकने मैदानावरच केला पंड्याला नमस्कार

पुण्यात थोरले बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळाने उत्सव मंडपात मोठ्या पडद्यावर भारत-पाकिस्तान सामन्याचे प्रक्षेपण केले होते. यावेळी सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भारताने ५ गडी राखत विजय मिळवल्यानंतर फटाके फोडत जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 : भारताने पाकिस्तानला नमवलं! ५ गडी राखून दणदणीत विजय

तर कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने पाच गडी राखून गाठले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत ३३ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People celebrate india win over pakistan in asia cup spb