विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत पराभूत झाल्यावर समाजमाध्यमांवर कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला कोहलीने चांगलेच फटकारले असून खिल्ली उडवणाऱ्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी, असे कोहलीने म्हटले आहे.
‘‘विश्वचषकात पराभूत झाल्यावर ज्या पद्धतीने समाजमाध्यमांवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्या असभ्य होत्या. व्यक्ती पातळीवर मी या गोष्टींमुळे दुखावलो आहे. या पराभवानंतर लोकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही लज्जास्पद होती,’’ असे कोहली म्हणाला.
खासगी आयुष्यावरील टीकेला विराट कोहलीने फटकारले
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत पराभूत झाल्यावर समाजमाध्यमांवर कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
First published on: 11-04-2015 at 05:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People who said those things about anushka sharma should be ashamed of themselves virat kohli