Peruvian Footballer Killed By Lightning Strike Video Viral : दक्षिण अमेरिकन देश पेरूच्या हुआनकायो शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. यासह अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना चिल्का जिल्ह्यात घडली जिथे स्थानिक संघ जुव्हेंटुड बेलाविस्ताचा सामना फॅमिलिया चोकाशी होत होता. सामन्याच्या २२व्या मिनिटाला, जेव्हा बेलाविस्टा २-० ने आघाडीवर होता, तेव्हा जोरदार विजेचा कडकडाट झाला. त्यामुळे रेफरीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळाडू मैदान सोडण्यापूर्वीच वीज पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोलरक्षकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू –

या अपघातात ३९ वर्षीय बचावपटू जोस ह्यूगो डे ला क्रूझ मेझा यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याने तो जमिनीवर कोसळल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये दिसत आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही. यासोबतच ४० वर्षीय गोलरक्षक जुआन चोक्का लक्ता हाही गंभीर भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिररमधील वृत्तानुसार, १६ आणि १९ वयोगटातील दोन खेळाडू आणि २५ वर्षीय क्रिस्टियन सेझर पिटूय काहुआना, ज्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वीज पडल्यानंतरचे दृश्य

या वर्षातील दुसरी घटना –

हेही वाचा – AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण

याच वर्षी फेब्रुवारीमध्ये एका इंडोनेशियन फुटबॉलपटूचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. एफएलओ एफसी बांडुंग आणि एफबीआय सबांग यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान, मैदानात वीज पडली आणि खेळाडूचा मृत्यू झाला. गेल्या १२ महिन्यांत इंडोनेशियन फुटबॉल खेळाडूला विजेचा धक्का बसण्याची दुसरी दु:खद घटना आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये, पूर्व जावामधील बोजोनेगोरो येथील एका तरुण फुटबॉल खेळाडूला सोराटिन अंडर-१३ चषकादरम्यान विजेचा धक्का बसला होता. २०२३ मध्येच एका २१ वर्षीय ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूचाही मैदानावर वीज पडून मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peruvian footballer killed by lightning strike during match juventud bellavista vs familia chocca five others injured video viral vbm