IND vs ENG 1st ODI Updates in Marathi: भारत-इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी विस्फोटक सुरूवात केली. नागपूरमध्ये खेळवल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी मैदानात उतरलेल्या फिल सॉल्ट आणि बेन डकेटने विस्फोटक सुरूवात केली खरी पण पॉवरप्लेमध्येच एका धावेच्या नादात विकेट गमावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ च्या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीने मेडन षटकाने चांगली सुरूवात केली. पण हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकापासून डकेट-सॉल्टने आक्रमक पवित्र्याने फलंदाजी केली. पदार्पणातील पहिल्याच षटकात हर्षितला २ चौकार लगावत सॉल्टने स्वागत केलं. यानंतर सामन्यातील सहाव्या षटकात फिल सॉल्टने हर्षित राणाविरूद्ध २६ धावा केल्या.३ षटकार आणि २ चौकार लगावत ६ षटकांमध्ये इंग्लंडने ५२ धावा केल्या.

सॉल्ट आणि डकेट प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवर मोठमोठे फटके खेळत धावा करत होते. यानंतर आठव्या षटकात हार्दिककडे गोलंदाजी सोपवण्यात आली. तोपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ७० पुढे होती. सॉल्ट ४२ धावा तर डकेट ३१ धावा करत खेळत होता. हार्दिकने षटकातील पाचवा चेंडू स्टंप्सवर शॉर्ट बॉल टाकला. सॉल्टने बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलला आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने धाव घेत होता. तिथे श्रेयस अय्यर तैनात होता.

श्रेयसच्या इथून चेंडू सीमारेषेच्या दिशेन जाताना पाहताच श्रेयसने जोरदार धावायला सुरूवात केली. तोपर्यंत इथे सॉल्ट आणि डकेटने दोन धावा घेतल्या होत्या. तोपर्यंत श्रेयसने चेंडू अडवला तर सॉल्ट तिसऱ्या धावेसाठी गेला आणि डकेट दुसऱ्या टोकाला आरामात उभा होता. तर सॉल्ट धाव घेण्यासाठी अर्ध्या रस्त्यात पोहोचला होता, तर डकेट धाव घेण्यासाठी तयार नव्हता. तितक्यात श्रेयसने चेंडू राहुलकडे फेकला आणि सॉल्टला धावबाद केलं. श्रेयसने त्याच्या जागेपासून ३२ मी. धाव घेत जबरदस्त फिल्डिंग करत चेंडू वेळेत फेकला आणि भारताला पहिली विकेट मिळाली.

पहिल्या विकेटनंतर एका षटकात २६ धावा देणाऱ्या हर्षित राणाने पुढच्या १०व्या षटकात २ विकेट घेत इंग्लंडच्या धावांवर आळा घातला. यासह १५ षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या ३ बाद ९९ धावा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phil salt suicidal run out by shreyas iyer and kl rahul in ind vs eng 1st odi watch video bdg