Phil Simmons selected as coach of TKR: आयपीएल २०२३ च्या समाप्तीनंतर, सीपीएल म्हणजेच कॅरिबियन प्रीमियर लीग वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केली जाणार आहे. केकेआरची फ्रँचायझी त्रिनबागो नाइट रायडर्सने या लीगसाठी आपल्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. फ्रँचायझीने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिल सिमन्स भारताच्या अभिषेक नायरची जागा घेणार आहे. अभिषेक नायर सध्या कोलकाता नाइट रायडर्सचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. फिल सिमन्सने यापूर्वी सीपीएलमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली बार्बाडोस रॉयल्सला चॅम्पियन बनवले होते. बार्बाडोस रॉयल्स म्हणजे आताचे बार्बाडोस ट्रायडेंट्स म्हणून ओळखले जाते.

किरॉन पोलार्ड हा त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार आहे. फिल सिमन्सच्या नियुक्तीबाबत तो म्हणाला, ‘कर्णधार म्हणून फिल सिमन्सला आमच्यासोबत घेऊन मी खूप उत्साहित आहे. आम्ही एक जोडी म्हणून उत्तम काम केले आहे. आम्ही ते आंतरराष्ट्रीय स्तरावर केले होते. आता टीकेआरसाठी एकत्र करण्याची संधी आहे. आशा आहे की आमची ही जोडी चेहऱ्यावर हसू आणेल आणि टीकेआरसाठी पुन्हा उत्साहवर्धक परिणाम आणेल.

फिल सिमन्सची कोचिंग कारकीर्द –

फिल सिमन्सची कोचिंग कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. ते दोन वेळा वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय सिमन्सने झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तानचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्यानंतर त आयए टी-२० मध्ये दुबई कॅपिटल्सचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याचबरोबर या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – GT vs SRH: ‘लव्ह स्टोरीचे रुपांतर झाले लग्नात’; शुबमन गिलच्या शतकावरील सेहवागच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये पिकला हशा

त्रिनबागो नाइट रायडर्स हा सीपीएलचा सर्वात यशस्वी संघ –

त्रिनबागो नाइट रायडर्स ही चार विजेतेपदांसह सीपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. गेल्या वर्षी या संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे हा संघ पहिल्यांदाच गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला होता. त्रिनबागो नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही अशी ही पहिलीच वेळ होती.

कॅरिबियन प्रीमियर लीग संघ –

१. जमैका तल्लावा
२. सेंट लुसिया राजे
३. त्रिनबागो नाइट रायडर्स
४. सेंट किट्स आणि नेव्हिस देशभक्त
५. बार्बाडोस रॉयल्स
६. गयाना ऍमेझॉन वॉरियर्स

हेही वाचा – DC vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे धर्मशाला येथे पारंपारिक नृत्यासह झाले भव्य स्वागत, पाहा VIDEO

सीपीएल २०२३ चे आयोजन कधी होणार –

२०२३ मध्ये होणारी ही टी-२० लीग १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. पहिला सामना सेंट लुसिया किंग्स आणि जमैका तल्लावाह यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, त्रिनबागो नाइट रायडर्स त्यांचा पहिला सामना सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध १९ ऑगस्ट रोजी खेळेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phil simmons appointed as head coach of trinbago knight riders for cpl 2023 vbm