आपल्या चेंडूने फिल ह्युजेसचा बळी गेला, या भावनेने गोलंदाज सीन अॅबॉट पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला यावेळी आधार द्यायला सारेच सरसावले असून यामध्ये फिलची बहीण मॅगनचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि मानसोपचारतज्ज्ञ देखील अॅबॉटला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने अॅबॉटशी चर्चा करून त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिलची बहिण मॅगनने अॅबॉटचे सांत्वन करत समुपदेशन केले. अॅबॉटला येत असलेला अनुभव हा भयावह आणि दु:खद आहे. या सामन्यात मैदानात असलेल्या प्रत्येक खेळाडूला असा अनुभव येत असेल, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे डॉक्टर पीटर ब्रुकनेर यांनी सांगितले.
फिल ह्युजेसच्या बहिणीकडून अॅबॉटचे सांत्वन
आपल्या चेंडूने फिल ह्युजेसचा बळी गेला, या भावनेने गोलंदाज सीन अॅबॉट पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला यावेळी आधार द्यायला सारेच सरसावले असून यामध्ये फिलची बहीण मॅगनचाही समावेश आहे.

First published on: 28-11-2014 at 07:07 IST
TOPICSफिलिप हय़ुजेस
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phillip hughes sister sat with traumatised bowler sean abbott