उसळत्या चेंडूने फिलिप हय़ुजेस या ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा बळी घेतला गेला असला तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाज आगामी मालिकांमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करीतच राहणार आहेत, असे त्यांच्या सरावावरून स्पष्ट झाले आहे.
हय़ुजेसचे निधन झाल्यानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी येथे सराव केला. खेळाडूंनी अतिशय गांभीर्याने भाग घेतला. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी गोलंदाजांनी सावध पवित्रा घ्यावा असा सल्ला दिला असला तरी त्यांच्या शेन वॉटसन, ख्रिस रॉजर्स यांच्यासह मुख्य गोलंदाजांनी सरावात भरपूर वेळा उसळत्या चेंडूंचा उपयोग केला. डेव्हिड वॉर्नर, मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, जोश हॅझलवूड यांनीही सरावात उत्साहाने भाग घेतला.
सरावानंतर लेहमन म्हणाले, ‘‘आमच्या खेळाडूंवर अप्रत्यक्षरीत्या थोडेसे दडपण आले असले तरी आम्ही विजय मिळविण्यासाठीच कसोटीत खेळणार आहोत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा