Phoebe Litchfield was bought by Gujarat Giants for Rs 1 Crore : महिला प्रीमियर लीग २०२४च्या मिनी लिलावाला धमाकेदार सुरुवात झाली. मुंबईत सुरू असलेल्या या लिलावात पहिल्याच खेळाडूवर १ कोटी रुपयांचा बोली लावण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. फोबीची मूळ किंमत ३० लाख रुपये ठेवण्यात आली होती. तिला विकत घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. शेवटी गुजरात फ्रँचायझीने बाजी मारत आपल्या संघात सामील करुन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोबी लिचफिल्ड फक्त २० वर्षांची आहे. तिची फलंदाजीची शैली अतिशय आक्रमक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ती अतिशय स्फोटक पद्धतीने धावा करते. तिने आतापर्यंत केवळ ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत तिची सरासरी ४९.५० आणि स्ट्राइक रेट २२० चा राहिला आहे.

फोबी ही डावखुरी फलंदाज आहे. गेल्या वर्षीच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बरोबर एक वर्षापूर्वी, 11 डिसेंबर रोजी, तिने भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा सामना भारताविरुद्ध मुंबईत झाला होता. आता वर्षभरानंतर मुंबईत तिचे नशीब पुन्हा एकदा चमकले आहे.

हेही वाचा – ZIM vs IRE : सिकंदर रझा आयरिश खेळाडूंशी भिडला; लाइव्ह सामन्यात बॅट घेऊन मारायलाही धावला, पाहा VIDEO

या एका वर्षातच फोबीने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. आतापर्यंत या खेळाडूने ११ वनडे आणि एक कसोटी सामना खेळला आहे. फोबीची कसोटीत फलंदाजीची सरासरी ३४.५० आहे आणि एकदिवसीय सामन्यात तिची फलंदाजीची सरासरी ४९.१४ आहे. आतापर्यंत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phoebe litchfield was bought by gujarat giants for rs 1 crore in wpl 2024 auction vbm