fans and sponges to dry R Premadasa Stadium ground: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२३ च्या सुपर फोरमधील तिसरा सामना कोलंबोमध्ये खेळला जात होता. मात्र पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. त्यामुळे सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला. सोमवारी, सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू होईल आणि सामना ५०-५० षटकांचा खेळला जाईल. तत्पुर्वी ग्राऊंड स्टाफ मैदान सुकविण्यासाठी प्रयत्न करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटके खेळली. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर ग्राऊंड स्टाफ मेहनत करताना दिसला. कर्मचार्यांनी प्रथम मैदान कोरडे करण्यासाठी स्पंजचा वापर केला आणि नंतर पंखे देखील आणले. ज्याचे फोटो आणि आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
वास्तविक आर. प्रेमदासा स्टेडियमचे मैदान पावसामुळे ओले झाले होते. ते सुकविण्यासाठी, ग्राउंड स्टाफने प्रथम स्पंज वापरला. पण तरी ही मैदान सुकले नाही. यानंतर कर्मचारी पंख्यासह मैदानात पोहोचले. टीव्ही प्रेझेंटर जतीन सप्रू यांनी लाइव्ह कार्यक्रमादरम्यान सांगितले की, कर्मचार्यांनी पंखे मैदानात नेण्यासाठी सुमारे ८० मीटर लांब तारा खेचल्या. यानंतर पंखे मैदानात आणून मैदान कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा – NZ vs ENG 2nd ODI: ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मिचेल सँटनरने जॉनी बेअरस्टोचा घेतला अप्रतिम झेल, पाहा VIDEO
टीम इंडियाचा खेळाडू रविचंद्रनने ग्राऊंड स्टाफचे खूप कौतुक केले आहे. त्याने एक्सवर अॅपवर फोटोही शेअर केले आहेत. रविचंद्रन अश्विनने यापूर्वीही पोस्ट केली होती. भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांनीही पावसासंदर्भात अनेक मजेशीर पोस्ट शेअर केल्या आहेत.
कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशा स्थितीत मैदानावर पुन्हा कव्हर्स पसरले आहेत. आता हा सामना राखीव दिवशी पोहोचला आहे. आज सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा सामना आता सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पावसामुळे आज जिथे थांबला होता, त्याच ठिकाणाहून सामना सुरू होईल. म्हणजेच सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू होईल. सोमवारी फक्त ५०-५० षटकांचे सामने खेळवले जातील. उद्याही पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.