MS Dhoni Seven Rupee Coin : भारत आणि जगाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार आणि यष्टिरक्षकाची जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा एमएस धोनीचे नाव अग्रक्रमावर येते. धोनीचे देशातच नव्हे तर जगभरात अनेक चाहते आहेत. आयपीएलदरम्यान एमएस धोनीबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळीच पाहायला मिळते. सोशल मीडियापासून दूर राहणारा धोनी त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता धोनीचा एक फोटो चर्चेत आला आहे. ज्यामध्ये आरबीआय धोनीच्या सन्मानार्थ ७ रुपयांचे नवीन नाणे जारी करणार असल्याचा दावा केला आहे.

धोनीच्या सन्मानार्थ सात रुपयांच नाणं येणार?

सोशल मीडिया हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या सोशल मीडियावर कधी आणि कोणाबद्दल काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आता. एमएस धोनीबाबत असेच काहीसे घडत आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल एक फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेचा उल्लेख करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ आरबीआय ७ रुपयांचे नवीन नाणे जारी करणार आहे. ही माहिती खरी आहे की खोटी? याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेकमध्ये माहिती देण्यात आली आहे.

Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान
Mahindra new EV project in Chakan print
महिंद्राचा चाकणमध्ये नवीन ईव्ही प्रकल्प
Mumbai new housing policy draft includes provision to deposit Maharera fees with state government
महारेराची स्वायत्तता धोक्यात? नोंदणी, तक्रारीसह इतर बाबींपोटी जमा होणाऱ्या शुल्कावर सरकारचा अधिकार
45 lakh fraud occurred claiming college admission
सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक

काय आहे सत्य?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हायरल दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. अधिकृत हँडलवर पोस्ट ही माहिती देण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले की, “सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो दावा करत आहे की भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ ७ रुपयांचे नवीन नाणे जारी केले जाईल. जो फोटो पूर्णपणे खोटा आहे आणि आर्थिक व्यवहार विभागाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.”

हेही वाचा – SA20 : वयाच्या ३९व्या वर्षीही दिनेश कार्तिकची जबरदस्त चपळाई! हवेत उडी मारत एका हाताने टिपला अप्रतिम झेल

महेंद्र सिंग धोनीची कारकीर्द –

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानल्या जाणाऱ्या धोनीने याआधीच २००७ मध्ये टी-२० विश्वचषक भारतीय संघाला जिंकून दिला होता. यानंतर, २०११ मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली, भारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनला. धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटीत ४६७६ धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या खात्यात ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये १०७७३ धावा जमा आहेत. त्याने ९८ टी-२० सामन्यांत १६१७ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलचे २६४ सामने खेळले असून ५२४३ धावा केल्या आहेत.

Story img Loader