प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ३८व्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा ४१-३७ असा पराभव करत रोमांचक विजय नोंदवला. या विजयासह हरयाणा स्टीलर्सचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर दुसरीकडे बंगाल वॉरियर्सचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे.

पूर्वार्धानंतर बंगाल वॉरियर्सने हरयाणा स्टीलर्सविरुद्ध १८-१५ अशी आघाडी घेतली. या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांच्या बचावपटूंची कामगिरी जबरदस्त होती. बंगालच्या सचिन विट्टलाने हाय-५ पूर्ण केले, तर हरियाणा स्टीलर्सकडून सुरेंदर नाडा आणि जयदीप कुलदीपने प्रत्येकी ३ गुण घेतले. दरम्यान, १३व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सने हरयाणाला ऑलआऊट केले. मात्र, हरयाणा स्टीलर्सही मागे राहिले नाहीत, कारण २० मिनिटे संपण्यापूर्वीच ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना ऑलआऊट करण्याच्या जवळ पोहोचले.

bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Harbhajan Singh Slams Team India For BGT Defeat and Recent Struggles and statement on Gautam Gambhir
Harbhajan Singh on Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर आल्यानंतर ‘टीम इंडिया’ची वाताहात; हरभजन सिंगचा थेट हल्ला
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

उत्तरार्धाच्या सुरुवातीला हरयाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सला ऑलआऊट केले. हरयाणाने आपली पकड कमकुवत होऊ दिली नाही आणि त्यामुळेच ते दुसऱ्यांदा गतविजेत्यांना ऑलआऊट करण्याच्या जवळ पोहोचले. मात्र, बंगालच्या दोन्ही इराणी खेळाडूंनी (अबोझर मिघानी आणि मोहम्मद नबीबक्ष) आपल्या संघाला उत्कृष्ट टॅकलने वाचवले. मीतूच्या शानदार चढाईच्या बळावर हरयाणाने अखेर बंगालला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले. मीतूनेही सुपर १० पूर्ण केला, तर दुसरीकडे बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगनेही सुपर १० पूर्ण केला.

हेही वाचा – श्रीलंकेच्या खेळाडूचा कसोटी क्रिकेटला रामराम; ७ जानेवारी तारीख ठरली खास!

बंगालने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विकास कंडोलाने त्याच्या चढाईत दोन गुण मिळवले आणि सामना बंगालपासून दूर नेला. शेवटी हरयाणा स्टीलर्सने सामना जिंकला. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगने या सामन्यात सर्वाधिक १४ गुण मिळवले.

Story img Loader