प्रो कबड्डी लीग २०२१-२२च्या १६व्या दिवशी आज पहिला सामना चांगलाच रोमांचक ठरला. बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्स आणि तामिळ थलायवास या दोघांनी ३०-३० अशी बरोबरी पत्करली. पूर्वार्धात पिछाडीवर पडल्यानंतर थलायवासने जोरदार पुनरागमन केले. पाटणा ने पूर्वार्धात ६ गुण अधिक मिळवले, तर थलायवासने उत्तरार्धात ६ गुण अधिक मिळवले. यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सामन्यात थलायवास संघाच्या अजिंक्य पवारने चढाईत सर्वाधिक १२ गुण मिळवले. तर सुरजितने बचाव करताना ४ गुण घेतले. पाटणाकडून मोनू गोयतने ९ गुण घेतले. तर शादलोई चिन्नाने बचाव करताना ३ गुण घेतले. पाटणा पायरेट्सने ६ सामन्यांमध्ये हा पहिला सामना टाय खेळला. आतापर्यंत त्यांनी ४ सामने जिंकले आहेत, तर एक सामना गमवावा लागला आहे. त्यांचे २४ गुण झाले असून, संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तामिळ थलायवासने ७ पैकी चौथा सामना टाय खेळला. संघ २२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IND vs SA: ‘‘तुम्ही लोक मला…”, भारतीय खेळाडूंवर अंपायर नाराज? स्टम्प माइकमधून ऐकू आलं ‘असं’ काही!
दोन्ही संघ –
पाटणा पायरेट्स – गुमान सिंग, मोहित, मोनू गोयत, प्रशांत कुमार, राजवीर सिंग, सचिन तन्वर, सेल्वामणी के, सी साजिन, डॅनियल ओमोंडी, साहिल मान, शादलोई चिन्ना, नीरज कुमार, संदीप, शुभम शिंदे, सौरव गुलिया, सुनील.
तामिळ थलायवास – के परपंजन, अजिंक्य पवार, मनजीत, अतुल एमएस, भवानी राजपूत. अन्वर साहिब बाबा, सौरभ तानाजी पाटील, सागर कृष्णा, संथापनसेल्व, सागर, हिमांशू, एम अभिषेक, मोहम्मद तुहीन तरफदार, सुरजित सिंह, मोहम्मद तरदी, साहिल.