PKL Auction 2024 Sold Players List: प्रो कबड्डी लीग २०२४ च्या ११व्या हंगामातील लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंवर कोटींची बोली लागली. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असलेल्या या लिलावात सचिन तंवर सर्वाधिक बोली लागणार खेळाडू ठरला. तामिळ थलायवासने स्टार रेडर सचिन तन्वरसाठी २ कोटी १५ लाखांची बोली लावली. सचिनची मूळ किंमत तीस लाख रुपये होती. सचिन तन्वर हा करो या मरो रेडचा स्पेशालिस्ट खेळाडू आहे. अनुभवी रेडर परदीप नरवाल दुसऱ्यांदा बेंगळुरू बुल्समध्ये सामील होणार असून, फ्रँचायझीने त्याला ७० लाख रुपयांना खरेदी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Vinesh Phogat Coach: “त्या रात्री तिचा जीव गेला असता…” विनेश फोगटच्या कोचने अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करतानाचा सांगितला प्रसंग

प्रो कबड्डी लीग २०२४ (PKL Auction 2024) साठी खेळाडूंच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सचिन तन्वर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला तर प्रो कबड्डीच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. इराणच्या मोहम्मदरेझा शादलोई चियानेहलाही हरियाणा स्टीलर्सकडून २.०७ कोटी रुपयांची मोठी बोली लावत त्याला करारबद्ध केले. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पवन सेहरवतला तेलुगू टायटन्सने १.७२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले. भरतला १.३० कोटी रुपयांची बोली लागली. मनिंदर सिंगला १.१५ कोटी, अजिंक्य पवारला १.११ कोटी आणि यू मुंबाने १.१५ कोटींची बोली लावत सुनील कुमारला संघात घेतले.

हेही वाचा – Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं

गुजरात जायंट्सनेही गुमान सिंगला १.९७ कोटी रुपयांना करारबद्ध केले, परंतु पुढील हंगामासाठी त्यांचा संघ समतोल राखण्यासाठी त्यांना लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मोठा खर्च करावा लागणार आहे. लिलावानंतर सचिन तन्वरने आनंद व्यक्त केला आणि तमिळ थलायवासकडून एवढी मोठी बोली मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले. सचिन तन्वर म्हणाला की, मला वाटले होते की मला १.७०-१.८० कोटीची बोली लागेल. लिलावापूर्वी मी नर्व्हस होतो आणि ही रात्र माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय असेल. लिलावात आधी लाखात बोली लागायची, आता कोटींच्या बोली लागतात ही खेळ आणि तरुणांसाठी मोठी गोष्ट आहे. कबड्डीने ही मोठी पातळी गाठली आहे.

हेही वाचा – Shakib Al Hasan: “बांगलादेशातील लोकांच्या हत्येला शकीबही जबाबदार…”, पाकिस्तानविरूद्ध मालिकेसाठी निवड होताच शकीब अल हसनवर कठोर शब्दात टीका

PKL 2024: प्रो कबड्डी लीग २०२४ च्या लिलावातील आठ महागडे खेळाडू

१. सचिन तन्वर – २.१५ कोटी (तमिल थलायवास)
२. मोहम्मदरेझा शादलोई चियानेह, ईराण – २.०७ कोटी (हरियाणा स्टीलर्स)
३. गुमान सिंग – १.९७ कोटी (गुजराट जायंट्स)
४. पवन सेहरावत – १.७२ कोटी (तेलुगु टायटंस
५. भारत हुडा – १.३० कोटी (युपी योद्धा)
६. मनिंदर सिंग – १.१५ कोटी (बंगाल वॉरियर्ज)
७. सुनील कुमार – १.१५ कोटी
८. अजिंक्य पवार – १.११ कोटी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl 2024 auction sachin tanwar most expensive players with 215 cr pardeep narwal pawan sehrawat read top 5 players bdg