प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ८८व्या सामन्यात, पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३७-३५ असा पराभव करत नववा विजय मिळवला. पाटणा संघाचे १४ सामन्यात ५० गुण झाले आहेत. तर यूपी योद्धाचा १६ सामन्यांमधला आठवा पराभव आहे. यूपी योद्धाने सुरुवातीपासूनच स्टार रेडर परदीप नरवालला वगळले. त्यामुळे संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या हाफनंतर पाटणा संघ २०-१५ असा आघाडीवर होता. १२व्या मिनिटाला पाटणाने यूपीला ऑलआऊट केले. यूपी योद्धाने पूर्वार्ध संपण्यापूर्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही ते ५ गुणांनी मागे राहिले. उत्तरार्धाच्या सुरुवातीला, यूपी योद्धाने २२व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सला ऑलआउट करत जबरदस्त पुनरागमन करत स्कोअर २१-२१ असा केला. पुढील काही मिनिटांत यूपीनेही आघाडी घेतली आणि सुरिंदर गिलने सुपर १० पूर्ण केला. मात्र, यानंतर सचिननेही सुपर १० पूर्ण करून पाटणाला आधार दिला. ३३व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने गुणफलक २८-२८ असा केला.

हेही वाचा – वादात सापडला दादा..! BCCIचा अध्यक्ष म्हणून गांगुली करतोय ‘हे’ चुकीचं काम?

३६व्या मिनिटाला परदीप नरवाल यूपीचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला, पण तो आधीच चढाईत बाद झाला आणि पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाला ऑलआऊट करून ४ गुणांची आघाडी घेतली. परदीपने दुसऱ्या चढाईत दोन गुण मिळवले पण तोपर्यंत उशीर झाला होता. यूपी योद्धाकडून सुरिंदर गिलने १० आणि श्रीकांत जाधवने ९ गुण घेतले.

पुणेरी पलटणचा यू मुंबावर विजय

पुणेली पटलण आणि यू मुंबा या महाराष्ट्राच्या दोन संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पुणे संघाने यू मुंबाचा ३६-३४ असा पराभव केला आणि आठव्या विजयासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. यू मुंबानेही या सामन्यातून एक गुण मिळवला आणि पाचव्या ते चौथ्या स्थानावर पोहोचले. पुणेरी पलटणने सामन्यात चांगले पुनरागमन करत विजय मिळवला.

या सामन्यात पुणेरी पलटणकडून मोहित गोयतने ९ तर अस्लम इनामदारने ८ गुण घेतले. व्ही. अजितचा सुपर १० यू मुंबासाठी व्यर्थ गेला, तर अभिषेक दुसऱ्या हाफमध्ये फ्लॉप ठरला. बचावात फक्त रिंकूच छाप पाडू शकला आणि त्याने ४ टॅकल पॉइंट घेतले.