श्रीलंकेच्या खेळाडूंना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यास त्यांच्या क्रिकेट मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे, मात्र या खेळाडूंनी चेन्नईतील सामन्यांमध्ये भाग घेऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मंडळाने खेळाडूंच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत परराष्ट्र मंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी दिलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे खेळाडूंना चेन्नई वगळता अन्यत्र खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या खेळाडूंनी तामिळनाडूमध्ये जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर श्रीलंका मंडळाने सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी प्रत्येक खेळाडूच्या सुरक्षा व्यवस्थेची हमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Play in ipl but not in chainnai shrilanka cricket board