मोहालीतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पदार्पण करत शिखर धवनने १८७ धावांची दणकेबाज खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका उचलली. या वेळी साऱ्यांनीच त्याचे कौतुक केले असून यामध्ये आता भर पडली आहे ती ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर इडी कोवनची. धवनची मोहालीची खेळी ही सर डॉन ब्रॅडमन यांच्यासारखी होती, असे कोवनने म्हटले आहे. धवन मोहालीमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यासारखा खेळला. त्याच्यासारखी जबरदस्त खेळी मी गेल्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पाहिली नव्हती. हा त्याचा पहिला कसोटी सामना होता आणि प्रत्येक चेंडूच्या दर्जानुसार त्याने फलंदाजी केली. प्रत्येक फलंदाजाचा एक दिवस असतो, त्या दिवशी त्याचा दिवस होता आणि त्याने तो चांगलाच गाजवला, असे कोवन म्हणाला.

Story img Loader