शिस्तभंग केल्याप्रकरणी चार खेळाडूंवर केलेली कारवाई योग्यच असल्याचा पुनरुच्चार ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी केला. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर प्रशिक्षक ऑर्थर यांनी संघाची कामगिरी सुधारावी यासंदर्भात खेळाडूंकडून टिपण मागवले होते. हे सादरीकरण दिलेल्या वेळात न दिल्याने उपकर्णधार शेन वॉटसनसह मिचेल जॉन्सन, उस्मान ख्वाजा आणि जेम्स पॅटिन्सन यांना एका कसोटीसाठी निलंबित करण्यात आले होते. ही कारवाई आगामी काळातील चांगल्यासाठीच होती. आम्हाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठायचे आहे आणि ते हे स्थान काबीज करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम संधीची आवश्यकता आहे. संघात कोणतीही दुफळी नसून, हे प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेले भ्रामक चित्र आहे. मायकेल क्लार्क आणि शेन वॉटसन यांच्यात काहीही बिनसलेले नाही. संघातला सुसंवाद उत्तम असून, खेळाडू जबरदस्त परिश्रम करत आहेत. सध्या आमच्याकडे युवा खेळाडूंचा भरणा असलेला चांगला संघ असून, त्यांचे उद्दिष्ट ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा सर्वोत्तम करण्याचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा