राष्ट्रीय विजेता संतोषकुमार, सिद्धी हिरे, सर्फराज नवाझ, पृथ्वीराज टिपुगडे, क्षितिज भोईटे, चैत्राली गुजर, सिद्धी ढगे आदी नामवंत खेळाडूंसह १०८० खेळाडू येथे शनिवार व रविवारी होणाऱ्या कुमारांच्या राज्य मैदानी स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
ही स्पर्धा सणस क्रीडांगणावर होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता राज्याचे उपक्रीडा संचालक माणिक ठोसरे यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सहा वाजता होईल.
या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १४ व १६ वर्षांखालील संघांची निवड केली जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या स्नेहल खैरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीत भाग्यश्री बिले, संतोष आंब्रे, प्रवीण खुटारकर व रमेश वाघमारे यांचा समावेश आहे.
राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्य़ाच्या १६ वर्षांखालील मुले व मुली संघांचे नेतृत्व अनुक्रमे संतोषकुमार व संपदा बुचडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players respond enthusiastically to youth state ground competition
Show comments