नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकल्यानंतर, केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्र सरकार खेळाडूंच्या बाजूचे असून खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आंदोलक खेळाडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केले.

राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचा कार्यकाळ संपल्याने पायउतार झालेले अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप महिला कुस्तीगिरांनी केले आहेत. तरीही त्यांना अटक न केल्यामुळे आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा मोर्चा आणि आंदोलन पोलिसांनी मोडून काढल्यानंतर मंगळवारी ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीगिरांनी हरिद्वारमध्ये ऑलिम्पिक पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर हा निर्णय रद्द करून त्यांनी सरकारला पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी आंदोलकांना सबुरीचा सल्ला दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players should be patient until the investigation is complete anurag thakur amy