Jasprit Bumrah and Kapil Dev Comparison : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार हे निश्चित नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने १५१.२ षटके टाकली होती. त्यामुळे पाठीच्या समस्येमुळे तो सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामना आणि मालिकाही गमवावी लागली. सध्या बुमराहच्या वर्कलोडवर चर्चा सुरु आहे, ज्यावर माजी महान कर्णधार कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, महान भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांना शांत केले. वेगवेगळ्या कालखंडातील खेळाडूंची तुलना निरुपयोगी असल्याचे त्यांनी म्हटले. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) च्या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना माजी भारतीय कर्णधाराने त्यांच्या खेळण्याचे दिवस आणि आधुनिक क्रिकेटमधील महत्त्वाच्या फरकांबद्दल खुलासा केला.
बुमराहशी तुलना करण्यावर कपिल देवची प्रतिक्रिया –
कपिल देव यांच्या मते त्यांची तुलना बुमराहशी करु नये. ते म्हणाले, “कृपया माझी (बुमराहशी) तुलना करू नका. तुम्ही एका पिढीची दुसऱ्या पिढीशी तुलना करू शकत नाही. आजची मुलं एका दिवसात ३०० धावा करतात, जे आमच्या काळात घडत नव्हतं. त्यामुळे तुलना करू नका.” माजी वेगवान गोलंदाज आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य बलविंदर संधू यांनी बुमराहच्या वर्कलोड मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या मते कसोटी डावात १५-२० षटके टाकणे हे सर्वोच्च पातळीवरील वेगवान गोलंदाजासाठी मोठे आव्हान नसावे.
हेही वाचा – Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
वर्कलोड मॅनेजमेंट ऑस्ट्रेलियन शब्द –
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाला, “कामाचा ताण? त्याने किती षटके टाकली? १५० काहीतरी, बरोबर ना? पण किती सामन्यात किंवा डावात? पाच सामने की नऊ डाव, बरोबर ना? म्हणजे प्रत्येक डावात १६ षटके किंवा प्रति सामन्यात ३० षटके. त्याने एका वेळी १५ पेक्षा जास्त षटके टाकली नाहीत, त्याने स्पेलमध्ये गोलंदाजी केली. मग ती मोठी गोष्ट आहे का? वर्कलोड मॅनेजमेंट मूर्खपणाचे आहे. हे ऑस्ट्रेलियन शब्द आहेत, जे ऑस्ट्रेलियन लोकांनी तयार केले आहेत.”
हेही वाचा – BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
बलविंदर संधू पुढे म्हणाले, “आमच्या काळात आम्ही दररोज २५-३० षटके टाकायचो. कपिल देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दीर्घकाळ गोलंदाजी केली. जेव्हा तुम्ही गोलंदाजी आणि गोलंदाजीच करता, तेव्हा तुमचे शरीर आणि स्नायू जुळवून घेतात. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटच्या या सिद्धांताशी मी सहमत नाही.”