PM Narendra Modi and Deputy Prime Minister of Australia will attend IND vs AUS final: एकदिवसीय विश्वलचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. रविवारी होणारा हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. होय, गेल्या दोन दिवसांपासून बातम्यांमधून ही चर्चा सुरु होती. पण, आता या ऐतिहासिक फायनलचा आनंद घेण्यासाठी पीएम मोदी स्टेडियममध्ये पोहोचणार असल्याचे निश्चित झाले आहे. पीएम फायनलमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्याबरोबर हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हे देखील दिसतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीएम मोदी किती वाजता स्टेडियममध्ये पोहोचतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील. तत्पूर्वी, पंतप्रधान राजस्थानमधील तारानगर आणि झुंझुनू येथे सभांना संबोधित करतील आणि त्यानंतर गुजरातला रवाना होतील. संध्याकाळी ते अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर थेट राजभवनाकडे रवाना होतील. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी रविवारी अहमदाबादमध्ये मुक्काम करणार –

अशाप्रकारे ते संध्याकाळी ५ नंतर कधीही नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर फायनल सामना पाहण्यासाठी पोहोचतील. या काळात आसाम आणि मेघालयसह दोन ते तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही विश्वचषकाचा फायनल सामना पाहण्यासाठी सहभागी होणार आहेत. अंतिम सामन्यानंतर (पीएम मोदी) पुन्हा एकदा राजभवनात जातील, जिथे ते रात्रीचे जेवण करतील आणि रात्री मुक्काम करतील. त्यानंतर सोमवारी ते गुजरातमधून राजस्थानला निवडणूक प्रचारासाठी रवाना होतील.

हेही वाचा – IND vs AUS Final: भारतीय क्रिकेटपटूंच्या मनगटावर असलेले ‘हे’ डिव्हाइस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही सविस्तर

भारताचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवही हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्याशिवाय २०११ मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवणारा महेंद्रसिंग धोनीही स्टेडियममध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर इतर संघाचे विश्वचषक विजेते कर्णधारही उपस्थित राहणार आहेत. राजीव शुक्ला, अमित शाह, जय शाह आणि अनेक सेलिब्रेटी आणि दिग्गज उद्योगपती अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचतील.

हेही वाचा – IND vs AUS Final: ऑस्ट्रेलियाच्या दोन माजी खेळाडूंसह ९ दिग्गजांकडून भारताच्या विजयाचे भाकीत, तर ‘या’ खेळाडूच्या मते ऑस्ट्रेलिया विजयी होणार

मेट्रो रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार –

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादचे पोलीस आयुक्त ज्ञानेंद्र सिंग मलिक म्हणाले, “ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान, आसामचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि इतर मान्यवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक फायनल पाहण्यासाठी येणार आहेत. सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आज आम्ही संध्याकाळी रिहर्सल करणार आहोत. मी लोकांना मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन करतो आणि मेट्रो रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील.”