Neeraj Chopra congratulated by PM Modi: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत नीरजने अंतिम फेरीत ८८.१७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले अभिनंदन –

पीएम मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोल्डन बॉयचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करताना लिहिले, “प्रतिभावान नीरज हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कटता त्याला केवळ ॲथलेटिक्समध्येच चॅम्पियन बनवत नाही, तर संपूर्ण क्रीडा जगतात अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक बनवते. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.”

क्रीडामंत्र्यांनी केले अभिनंदन –

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुडापेस्ट येथील जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, “भारतीय ॲथलेटिक्सच्या गोल्डन बॉयने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. तुमच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आणि हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात नेहमीच लक्षात राहील.”

भारतीय लष्कराने सुभेदार नीरज चोप्रा केला सलाम –

नीरज चोप्राने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. अशा परिस्थितीत, भारतीय लष्करानेही त्यांचे अभिनंदन करताना ट्विट केले की “नीरज चोप्रा आम्हाला पुन्हा अभिमान वाटतो, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८८.१७ मीटर फेक करून बुडापेस्टमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुभेदार नीरज चोप्रा यांचे भारतीय लष्कराकडून अभिनंदन.”

हेही वाचा –

नीरज चोप्राने असा रचला इतिहास –

नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीच्या पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटरचा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो त्याला अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत करण्यासाठी पुरेसा होता, त्यामुळे त्याला पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळाले. रविवारी झालेल्या फायनलमध्ये, चोप्राच्या भालाफेकने भारताला चॅम्पियनशिपमधील पहिले पदक आणि स्पर्धेच्या इतिहासातील अभूतपूर्व सुवर्णपदक जिंकण्यात मदत करण्यासाठी ८८.१७ मीटर अंतरापर्यंत उड्डाण केले.

Story img Loader