PM Narendra Modi Wrote a Letter to Neeraj Chopra Mother: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या आईला एक भावनिक पत्र लिहिले. नीरज चोप्राची आई सरोजा देवी यांनी घरी त्यांनी स्वत तयार केलेला चुरमा त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी पाठवला होता, याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी मोदींनी हे पत्र लिहिले होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वीच्या बैठकीमध्येही पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला या चुरमाची आठवण करून दिली होती.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी सर्वांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. नीरज चोप्रा मात्र भारतात नसल्याने तो ऑनलाईन उपस्थित होता. त्यावेळेसही मोदींनी नीरजला चुरमा कुठे आहे याबद्दल विचारणा केली होती आणि नंतर त्याच्या खेळाचं कौतुक करत त्याला पॅरिस ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. चुरमा मिळाल्यानंतर, पीएम मोदींनी सरोज देवी यांना पत्र लिहिले की त्यांनी बनवलेल्या पदार्थाची चव त्यांना त्यांच्या आईची कशी आठवण करून देते, हे त्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राच्या आईचे आभार मानण्यासाठी लिहिलेले पत्र
आदरणीय सरोज देवी जी,
विनम्र अभिवादन, आशा आहे की तुम्ही निरोगी आणि आनंदी असाल…काल जमैकाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला नीरजला भेटण्याची संधी मिळाली. त्याच्याशी चर्चा करताना त्याने मला तुम्ही स्वत:च्या हाताने तयार केलेला चुरमा दिला हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला.
आज हा चुरमा खाल्ल्यानंतर मी तुला पत्र लिहिण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही. नीरज अनेकदा माझ्याशी या चुरमाविषयी बोलतो, पण आज तो खाऊन मी भावूक झालो. तुमच्या या आपुलकीमुळे आणि आपलेपणाने मला आज माझ्या आईची आठवण झाली.
आई शक्ती, आपुलकी आणि समर्पणाचे प्रतीक आहे. नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधी हा प्रसाद मला आईकडून मिळाला हा योगायोग आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांत मी उपवास करतो. एक प्रकारे, तुम्ही दिलेला हा चुरमा माझ्या उपवासाच्या आधी माझा मुख्य आहार बनला आहे.
तुम्ही बनवलेले जेवण हे नीरजला देशासाठी पदक जिंकण्याची ऊर्जा देते. तसेच हा चुरमा मला पुढील ९ दिवस देशसेवेचे बळ देईल. या शक्तीपर्वाच्या नवरात्रीच्या निमित्ताने, मी तुमच्यासह देशाच्या मातृशक्तीला आश्वासन देतो की विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी मी अधिक सेवाभावनेने काम करत राहीन.
आपले मनापासून आभार…
नीरज चोप्राच्या आईने सरोज देवी यांनी पंतप्रधान मोदींना चुरमा तयार करून पाठवल्याने त्यांनी आभार मानणारे हे भावुक पत्र त्याच्या आईसाठी लिहिले आणि आपल्या आईची आठवण आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मोदींनी नीरज चोप्राच्या आईला लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.