नवी दिल्ली : भारतीय खेळाडू त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करेल, असे वचन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आशियाई स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अधिक उंचावलेली असेल अशी खात्री व्यक्त केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २८ सुवर्णपदकांसह १०७ पदके मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली. या पदक विजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी संवाद साधला. भारताच्या यशातील अर्धा वाटा महिला खेळाडूंचा राहिला याकडे लक्ष वेधत मोदी यांनी महिला खेळाडूंचे यावेळी विशेष आभार मानले. देशातील महिला खेळातही मागे नाहीत हे या खेळाडूंनी दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी सरकार खेळाडूंना प्रत्येक आघाडीवर मदत करेल. या वेळी आपण पदकांचे शतक गाठले. पुढील स्पर्धेत याहून अधिक पदके मिळवली जातील याची मला खात्री आहे, असे मोदी यांनी सांगितले.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

हेही वाचा >>> PAK vs SL: वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्डब्रेक रन चेज! रिझवान-शफिकच्या शतकी खेळीपुढे श्रीलंका नेस्तनाबूत, सहा विकेट्स दणदणीत विजय

अधिक युवकांनी खेळाकडे जोडले जावे यासाठी आशियाई स्पर्धा एक द्योतक होती. आता खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीने यशाचा नवा मार्ग उघडला गेला. नव्या पिढीला ही कामगिरी नक्कीच प्रेरणा देईल, असेही मोदी म्हणाले.

भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्याची दखलही मोदी यांनी या वेळी घेतली. ते म्हणाले,‘‘स्पर्धा कुठलीही असो आशियाई किंवा अन्य आंतरराष्ट्रीय. भारतीय खेळाडू पदक मिळवत आहेत. देशातील क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी हे चांगले संकेत आहेत. हे यश पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील प्रेरक ठरेल यात शंका नाही. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन अमलीपदार्थ आणि झटपट यशाच्या मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन करण्याची सूचना केली. तुम्ही आदर्श आहात. विद्यार्थी तुमचे लगेच ऐकतील असे मोदी यावेळी म्हणाले.

खेळाडूंवर अतिरिक्त ३ हजार कोटी खर्चाची तयारी

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत ३ हजारहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण, वैद्यकीय, आहारविषयक मदत मिळत आहे. आजमितीला खेळाडूंना एकूण २५ हजार कोटी रुपयांची मदत मिळत आहे. यापुढे खेळाडूंच्या  मार्गात आर्थिक मदतीची अडचण राहणार नाही. देशातच अधिक दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि खेळाडूंवर सरकार अतिरिक्त ३ हजार कोटी रुपये खर्च करेल, असे आश्वासनही मोदी यांनी या वेळी खेळाडूंना दिले.

भारतात प्रतिभेची, गुणवत्तेची कधीच कमतरता नव्हती. जिंकण्याची इच्छाही त्यांच्या मनात होती. त्या दृष्टीने त्यांची कामगिरीही चांगली होत होती. पण, काही पूरक आघाडय़ांवर अडचणी येत होत्या. त्यावर लक्ष केंद्रित केल्याने आज त्या सगळय़ांच्या प्रयत्नांचे मोठय़ा यशात रूपांतर झाले. नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान

Story img Loader