PM Narendra Modi on India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय मिळवले. यानंतर जगभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विजयावर भारतीय संघाचं अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतीय संघाने सर्वोत्तम खेळी करत अहमदाबादमध्ये विजय मिळवला. भारतीय संघाचे या कामगिरीसाठी अभिनंदन आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.”

अमित शाह म्हणाले, “तिरंगा उंच फडकत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या शानदार विजयासाठी अभिनंदन. भारताने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. एक ध्येय समोर ठेऊन संपूर्ण संघाने मेहनत घेणं देशासाठी किती अभिमानास्पद होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं.”

भारतीय फलंदाजीपुढे पाकिस्तान नेस्तनाबूत, सात गडी राखून दणदणीत विजय

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.

हेही वाचा : IND vs PAK, WC 2023: टीम इंडिया ८-०! हिटमॅन रोहितसमोर पाकिस्तान निष्प्रभ, सात गडी राखून उडवला धुव्वा

पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही

तत्पूर्वी, पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on victory in india vs pakistan icc cricket world cup 2023 match pbs