PM Narendra Modi : वजन वाढल्यामुळे महिलांच्या ५० किलो वजनी गटातून कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का आहे. या निर्णायामुळे सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं स्वप्नही भंगलं आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आता पंतप्रधान मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत विशेनला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझं अपात्र ठरवलं जाणं हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे बोलताना, आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, भारताला सर्वात मोठा धक्का

भारतीय ऑलिम्पिक समितीकडून परिपत्रक जारी

यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक समितीनेही परिपत्रक जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने म्हटलं आहे. याशिवाय भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

जपानच्या युई सुसाकीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक

दरम्यान, काल विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले होते. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पालटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला होता.

Story img Loader