PM Narendra Modi said like baseball cricket is becoming popular in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते व्हाईट हाऊसमधील डिनरचे कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खेळाविषयीही चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, क्रिकेट खेळ अमेरिकेतही लोकप्रिय होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
यासोबतच त्यांनी अमेरिकन संसदेलाही संबोधित केले. या संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध वाढविण्यावर चर्चा झाली. यासोबतच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता धोका, सीमेपलीकडील दहशतवादात पाकिस्तानची भूमिका आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबतही भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली.
व्हाईट हाऊसमध्ये डिनरचे दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “बेसबॉलप्रमाणे अरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी अमेरिकेचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.” मात्र, अमेरिकेचा संघ भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
एकदिवसीय विश्वचषकाचे क्वालिफायर सामने झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहेत. येथे अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश करतील. अमेरिकेचा संघ वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड आणि नेपाळसह अ गटात आहे. अमेरिकन संघाला साखळी टप्प्यातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह हा संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अमेरिकेचा एकमेव सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. हा सामना आपल्या नावावर करून अमेरिकन संघाला विश्वचषकातील आपला प्रवास विजयासह संपवायला आवडेल.
हेही वाचा – WI vs NEP: शाई होपने शतक झळकावत मोडला विराट कोहलीचा विक्रम, ‘या’ बाबतीत बाबर आझमलाही मागे टाकले
पात्रता फेरीचे स्वरूप कसे आहे –
सर्व प्रथम, दोन्ही गटांचे संघ आपापल्या गटात उपस्थित असलेल्या उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. २७ जूनपर्यंत ग्रुप स्टेजमध्ये एकूण २० सामने होतील. यानंतर दोन्ही गटातील टॉप-३ संघ मिळून सुपर-६ मध्ये स्थान मिळवतील.
सुपर-६ चे सामने २९ जूनपासून सुरू होणार आहेत. सुपर-६ टप्प्यात, सर्व संघ त्या संघांविरुद्ध सामने खेळतील ज्यांच्याविरुद्ध ते गट टप्प्यात खेळले नाहीत. येथूनच संघ अंतिम फेरीसाठी लढतील. अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. दोन्ही संघांना विश्वचषकात ९वे आणि १०वे स्थान मिळेल.