PM Shahbaz Sharif formed a high level committee: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही समिती भारत-पाकिस्तान संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा करेल, क्रीडा आणि राजकारण वेगळे ठेवण्याचे सरकारचे धोरण आणि खेळाडू, अधिकारी, चाहते आणि प्रसारमाध्यमांसाठी भारतातील परिस्थिती, शरीफ यांना आपल्या शिफारसी सादर करण्यापूर्वी चर्चा करेल.

पाकिस्तानाचा संघ भारतात येणार का?

पंतप्रधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) संरक्षक देखील आहेत. आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषकाचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येईल, असा त्यांना विश्वास आहे. तथापि, त्यांना पीसीबीकडून सांगण्यात आले आहे की, विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संघाचा सहभाग दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे सरकारी मंजुरीवर अवलंबून असेल.

हेही वाचा – MS Dhoni 42nd Birthday: माहीने आपल्या खास लोकांसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

समितीचे कोण-कोण आहेत सदस्य –

समितीच्या इतर सदस्यांमध्ये क्रीडा मंत्री अहसान मजारी, मरियम औरंगजेब, असद महमूद, अमीन-उल-हक, कमर जमान कैरा आणि माजी राजनयिक तारिक फात्मी यांचा समावेश आहे. संबंधित मंत्र्यांनी पीसीबीला आधीच सूचित केले आहे की, पाकिस्तानचे सामने होणार असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय सुरक्षा शिष्टमंडळ भारतात पाठवले जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला सामना –

क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान तासीर आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डर्बनला जाणार आहेत. या बैठकांमध्ये अश्रफ सुरक्षेचे कारण सांगून भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित करू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित विश्वचषक सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा – Sourav Ganguly Birthday: कोलकात्याच्या प्रिन्सची वाढदिवशी मोठी घोषणा! टीम इंडियाला अनेक दिग्गज खेळाडू देणारा दादा आता नेतृत्वाचे प्रशिक्षण देणार

भारत-पाकिस्तान फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात –

पाकिस्तान संघाचे दोन्ही सराव सामने हैदराबादमध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. त्यांच्या संघाला चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे सामने खेळायचे आहेत. भारत आणि पाकिस्तान फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांविरुद्ध सामने खेळतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm shahbaz sharif formed a high level committee to decide to send the pakistan team to india vbm