ब्रिटनच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी होणाऱ्या चीन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन मुख्य शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली. मॅकलॅरेन संघात दाखल झाल्यानंतरची त्याची ही पहिलीच पोल पोझिशन ठरली आहे.
अॅलर्जीचा त्रास सहन करत असलेल्या हॅमिल्टनने सराव शर्यतीत लोटसच्या किमी रायकोनेन याला मागे टाकत अव्वल स्थानी मजल मारली. हॅमिल्टनने १ मिनीट ३४.४८४ अशा वेळेत सर्वात वेगवान लॅप नोंदवली. रायकोनेनला १ मिनीट ३४.७६१ सेकंदांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फेरारीचा फर्नाडो अलोन्सो तिसरा वेगवान ड्रायव्हर ठरला. हॅमिल्टनचा सहकारी निको रोसबर्ग चौथा आला. फेरारीचा फेलिपे मासा आणि लोटसचा रोमेन ग्रॉसजेन यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान पटकावले. टोरो रोस्सोच्या डॅनियल रिकिआडरे याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत सातव्या स्थानावर मजल मारली. मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दोन वेळा जगज्जेता ठरलेला रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलला अखेरच्या सत्रात योग्य वेळेआधी लॅप पूर्ण करता न आल्याचा फटका बसला. त्यामुळे तो नवव्या स्थानावर फेकला गेला. सौबेरचा निको हल्केनबर्ग दहावा आला. वेटेल आणि त्याचा सहकारी मार्क वेबर यांच्यात सध्या खटके उडू लागल्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. वेबर मुख्य शर्यतीला १४व्या क्रमांकावरून सुरुवात करेल. सहारा फोर्स इंडियाच्या दोन्ही ड्रायव्हर्सना अव्वल १० जणांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. पॉल डी रेस्टा ११व्या तर एड्रियन सुटील १३व्या स्थानी फेकला गेला.
हॅमिल्टनला पोल पोझिशन
ब्रिटनच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी होणाऱ्या चीन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन मुख्य शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली. मॅकलॅरेन संघात दाखल झाल्यानंतरची त्याची ही पहिलीच पोल पोझिशन ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pole position to lewis hamilton