अमेरिकन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावून रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेल याने सलग तिसऱ्या जगज्जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या मोसमातील दोन शर्यती शिल्लक असून वेटेल इतिहासाच्या उंबरठय़ावर उभा आहे. तसे झाल्यास सलग तीन शर्यती जिंकणारा आणि सर्वात युवा ड्रायव्हर म्हणून तो जुआन मॅन्युएल फॅन्गिओ आणि मायकेल शूमाकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवेल. जगज्जेतेपदासाठी वेटेल आणि फेरारीचा फर्नाडो अलोन्सो यांच्यात १० गुणांचा फरक आहे. पात्रता फेरीत मॅकलॅरेनच्या लुइस हॅमिल्टन याने दुसरे, तर रेड बुलच्या मार्क वेबर याने तिसरे स्थान पटकावले. लोटसचे रोमेन ग्रॉसजेन आणि किमी रायकोनेन यांनी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी मजल मारली आहे.
वेटेलला पोल पोझिशन
अमेरिकन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत पोल पोझिशन पटकावून रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेल याने सलग तिसऱ्या जगज्जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
First published on: 19-11-2012 at 02:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pole position to vettel