ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि जगातील एक अव्वल फलंदाज रिकी पॉन्टिंग याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेला पॉन्टिंग उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणा-या पर्थ येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्त होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून माझी कामगिरी असमाधानकारक असल्यामुळे मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून मी खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. चांगला सराव करून एकदिवसीय आणि लीग क्रिकेटमध्ये मी खेळत राहणार आहे, असे रिकी पॉन्टिंगने ट्विटरवर सांगितले आहे.
रिकी पॉन्टिंगने आतापर्यंत १६७ कसोटी सामन्यांमध्ये १३३६६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४१ शतकं आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये २५७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.  
भारताच्या सचिन तेंडुलकरपाठोपाठ कसोटीमध्ये रिकी पॉन्टिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, पॉन्टिगने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने सचिनच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा चर्चेला जोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा