Ashes 2023, ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाचा उजव्या हाताचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याचे आकडे पाहून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हा स्मिथचा १००वा कसोटी असणार आहे. त्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने स्मिथबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक विजेता माजी कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाला, “जर त्याची कारकीर्द उद्या संपली, तर डॉन ब्रॅडमननंतर तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा महान फलंदाज असेल. आकडेवारीनुसार तुम्ही त्यावर तर्क करू शकत नाही. तो खूप लवकर गोष्टी पूर्ण करत आहे. लॉर्ड्सवरही तो इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू ठरला. त्याने ९००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी कमी डाव घेतले आहेत.”

हेही वाचा: Ashes 2023: सायमन टॉफेलने खिलाडूवृत्तीबद्दल बोलणाऱ्या इंग्लंडला दाखवला आरसा, बेअरस्टोच्या ‘त्या’ स्टंपिंगवर होतेय मोठी चर्चा

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार पुढे म्हणाला, “इनिंगच्या बाबतीत सर्वात वेगवान ३२ कसोटी शतके ही खूप मोठी कामगिरी आहे. तो कमी काळात हे सर्व यश मिळवत आहे. तो अजून किती काळ खेळेल याबद्दल मी तो थोडा सावध आणि साशंक आहे आणि यावर आता बोलणे जे माझ्यासाठी थोडे विचित्र वाटत आहे. तो झोप येत नाही अशी मजा करतो पण आता १००व्या कसोटीनंतर त्याला शांत झोप लागेल.”

हेही वाचा: World Cup: “१९८३ मध्ये नशिबाने भारत जिंकला…”, वेस्ट इंडीजच्या माजी वेगवान गोलंदाजाचे अचंबित करणारे विधान

१००वा कसोटी टप्पा गाठणारा स्मिथ हा १४वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरणार आहे. स्मिथने आतापर्यंत ९९ सामने खेळले असून त्यात त्याने ५९.५६च्या प्रभावी सरासरीने ९११३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३२ शतके, ४ द्विशतके आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या २३९ धावा आहे. तिसरी अ‍ॅशेस कसोटी लीड्समधील हेडिंग्ले येथे गुरुवार, ६ जुलैपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत २-० ने आघाडीवर असून विजेतेपद राखण्यासाठी एक विजय दूर आहे. आता ते तिसरा कसोटी सामना जिंकू शकेल की नाही, हे येणारा काळच समजेल.

१००व्या कसोटीत स्मिथ दिसणार खास जर्सीमध्ये

विशेष म्हणजे स्टीव्ह स्मिथ इंग्लंडविरुद्ध आणि त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात खास जर्सी घालणार आहे. त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून ही माहिती दिली आहे. वास्तविक, स्टीव्हने त्याच्या १००व्या कसोटीपूर्वी इंस्टा वर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट जर्सीचा फोटो टाकला आहे आणि कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की उद्या माझ्या १००व्या कसोटीसाठी एक खास शर्ट परिधान करणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ponting gave a big statement about steve smith said australias second greatest batsman after don bradman avw
Show comments