वरिष्ठ महिला टी-२० चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी चार संघ देखील जाहीर करण्यात आले. या संघाचे नेतृत्व लेगस्पिनर पूनम यादव, ऑफस्पिनर अष्टपैलू दीप्ती शर्मा, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू पूजा वस्त्राकर आणि ऑफस्पिनर अष्टपैलू स्नेह राणा यांच्या हाती देण्यात आले आहे. त्यांची कर्णधार पदी गुरुवारी निवड करणयात आली आहे. तसेच सर्व सामने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम येथे २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
अखिल भारतीय महिला निवड समितीने चार संघ जाहीर केले आहेत. या प्रत्येक संघाच १४ खेळाडूंचा सहभाग आहे. त्याचबरोबर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि डावखुरा फिरकीपटू राधा यादव यांनी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेतील सामने राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळवले जाणार आहेत.
पूनम भारत अ संघाची कर्णधार असेल, तर हरलीन देओल उपकर्णधार असेल, दीप्ती भारत ब संघाची कर्णधार असेल, तर शेफाली वर्मा उपकर्णधार असेल. पूजा भारत सी संघाचे नेतृत्व सभिनेनी मेघना (उपकर्णधार) सोबत करेल तर स्नेह जेमिमाह रॉड्रिग्स (उप-कर्णधार) सोबत भारत डी संघाचे नेतृत्व करेल.
विशेष म्हणजे, टी-२० चॅलेंजर ट्रॉफीसाठी चारही संघांच्या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अ संघात रेल्वेची अंजली सरवानी, ब संघात भारत आणि कर्नाटकची वेगवान गोलंदाज मोनिका पटेल, क संघात विदर्भाची कोमल जंजाड आणि डी संघात महाराष्ट्राची श्रद्धा पोखर या वेगवान गोलंदाज आहेत. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी आक्रमणात अधिक वैविध्य आणू शकतात.
ही स्पर्धा १० ते २६ फेब्रुवारीदरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी पूर्वतयारी स्पर्धा म्हणून काम करेल. टी-२० विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौरा होणार असून, त्यात यजमान आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जाणार आहे.
संघ पुढीलप्रमाणे आहेत-
भारत अ: पूनम यादव (कर्णधार), हरलीन देओल (उपकर्णधार), मुस्कान मलिक, एस सजना, अमनजोत कौर, दिशा कासट, श्रींका पाटील, सायका इशाक, मेघना सिंग, अंजली सरवानी, सहाना पवार, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), शिवली शिंदे (यष्टीरक्षक) आणि अनुषा एस.
भारत ब: दीप्ती शर्मा (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), धारा गुर्जर, युवश्री, अरुंधती रेड्डी, निशू चौधरी, हुमैरा काझी, देविका वैद्य, एसएस कलाल, मोनिका पटेल, एसएल मीना, सिमरन दिल बहादूर, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक)) आणि लक्ष्मी यादव (यष्टीरक्षक).
भारत क: पूजा वस्त्रेकर (कर्णधार), एस मेघना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, सिमरन शेख, तरनम पठाण, केपी नवगिरे, अंजली सिंग, राशी कनोजिया, सरन्या गडवाल, कीर्ती जेम्स, कोमल जंजाड, अजिमा संगमा, रिचा घोष (यष्टीरक्षक) आणि ममता (यष्टीरक्षक).
भारत ड: स्नेह राणा (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स (उपकर्णधार), अश्विनी कुमारी, डी. हेमलता, कनिका आहुजा, जसिया अख्तर, यास्तिका भाटिया, प्रियांका प्रियदर्शनी, शिखा पांडे.