एपी, फ्रँकफर्ट

सामन्याच्या अतिरिक्त वेळेत पोर्तुगालच्या रोनाल्डोकडून हुकलेली पेनल्टी आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियाच्या खेळाडूंना पहिल्याच तीन पेनल्टीमध्ये आलेले अपयश अशा नाट्यात रंगलेल्या सामन्यात पोर्तुगालने स्लोव्हेनियाचा ३-० असा पराभव करून युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Prithviraj Chavans statement regarding the election results satara
निवडणुकीच्या निकालाबाबत सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट: पृथ्वीराज चव्हाण
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?

सामना अतिरिक्त वेळेतच जाणार हे स्पष्ट दिसत असताना अतिरिक्त वेळेच्या पूर्वार्धात पोर्तुगालच्या रोनाल्डोला मिळालेली पेनल्टीची संधी साधता आली नाही. स्लोव्हेनियाचा गोलरक्षक यान ओब्लाकने रोनाल्डोची किक सुरेख अडवली. त्यानंतर शूटआऊटमध्ये पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाने स्लोव्हेनियाच्या पहिल्या तीनही पेनल्टी यशस्वीरीत्या अडवून पोर्तुगालचा विजय साकार केला. युरो स्पर्धेत तीन पेनल्टी अडवणारा कोस्टा पहिला गोलरक्षक ठरला. पोर्तुगालची गाठ आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सशी पडणार आहे.

हेही वाचा >>>VIDEO : ‘मला हे बदलायचे आहे…’, टीम इंडियातील निवडीनंतर रियान परागचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘लोक अगदी स्विचप्रमाणे…’

सामन्यातील संधीचा विचार करायचा झाला, तर पोर्तुगालनेच अधिक संधी मिळविल्या. पण, त्या सर्व दवडल्या. त्यामुळेच शूटआऊटमध्ये सलग तीन किक अडवणाऱ्या कोस्टाचा विजयात मोठा वाटा राहिला. नियोजित वेळेसह शूटआऊटपर्यंत कोस्टाने केलेले गोलरक्षण अधिक लक्षात राहिले. नियोजित वेळेत आघाडीपटू बेंजामिन व्हेर्बिचला यशस्वी अडवल्यानंतर कोस्टाने शूटआऊटमध्ये जोसिप इलिसिच, ज्युर बाल्कोवेच, बेंजामिन यांच्या किक शिताफीने अडवल्या. संपूर्ण सामन्यात पोर्तुगाल संघ नेहमीसारखा प्रभाव पाडू न शकल्यामुळे कोस्टाच्या कामगिरीला जास्त महत्त्व येते. ‘‘हा माझ्या कारकीर्दीतला सर्वोत्तम सामना म्हणावा लागेल. मला जे काही करता येईल, ते करायचे इतकेच माझे नियोजन होते. मी माझ्या भावना बरोबर घेऊनच उतरलो. स्लोव्हेनियाकडून कोण पेनल्टी घेऊ शकतो याचा आम्ही अभ्यास केला होता. प्रत्यक्षात त्यांनी क्रमवारीत बदल केला. त्यामुळे मलाही नियोजन बदलणे भाग पडले. उपांत्य फेरी गाठण्याचा आनंद मला आहेच. त्याहीपेक्षा आपले योगदान संघाच्या उपयोगी पडले याचा अधिक आनंद झाला,’’ असे कोस्टाने सांगितले.

संपूर्ण सामन्यात रोनाल्डोच्या कामगिरीकडेच सर्वांच्या नजरा होत्या. स्पर्धेत खेळणाऱ्या अन्य तारांकित खेळाडूंप्रमाणे रोनाल्डोही आपला लौकिक अद्याप दाखवू शकलेला नाही. जागितक क्रमवारीत ५७व्या स्थानावर असणाऱ्या स्लोव्हेनियाने गोलशून्य बरोबरीनंतर सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबवला. हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. सामन्यातील अपयशाची सल रोनाल्डोलाही होती. ‘‘अत्यंत कठीण काळातही मी कायम खंबीरपणे उभा राहिलो. आता जेव्हा संघाला माझी गरज होती, तेव्हा मी खेळू शकलो नाही याचे मला अधिक वाईट वाटते. सामन्याची सुरुवात वाईट झाली, पण कोस्टाने शेवट गोड केला,’’असे रोनाल्डो म्हणाला.

सामन्याच्या अतिरिक्त वेळेतील पूर्वार्धात पोर्तुगालला पेनल्टी देण्यात आली होती. पोर्तुगालचा डिओगो जोटा चेंडू घेऊन गोलकक्षात शिरला, तेव्हा त्याला ड्रकुसिचने अवैधरीत्या अडवल्यामुळे पंचांनी पोर्तुगालला पेनल्टी बहाल केली होती. पण, त्यावर रोनाल्डोला गोल करता आला नाही. स्लोव्हेनियाचा गोलरक्षक यान ओब्लाकने रोनाल्डोची किक सुरेख अडवली.

युरो स्पर्धेच्या इतिहासात गोल करणारा सर्वात वयस्क खेळाडू होण्याचा मान यामुळे रोनाल्डोला गमवावा लागला. केवळ शूटआऊटच नाही, तर संपूर्ण सामन्यातही त्याच्याकडून फारशी चांगली कामगिरी झाली नाही. हेडरने गोल करण्याच्या त्याच्या अनेक संधी अशाच वाया गेल्या. पोर्तुगालला चार फ्री-किक मिळाल्या होत्या. त्या रोनाल्डोनेच घेतल्या. पण, तो एकदाही स्लोव्हेनियाच्या गोलरक्षक ओब्लाकसमोर आव्हान उभे करू शकला नाही. स्लोव्हेनियाने संपूर्ण सामन्यात आपला बचाव भक्कम ठेवला होता. पोर्तुगालकडून चेंडू हिसकावून घेतल्यावर प्रत्येक वेळेस अंद्राझ स्पोरर आणि सेस्को यांना पास देण्याचे त्यांचे नियोजन दिसून आले. अर्थात त्यांना याचा फायदा उठवता आला नाही. पूर्वार्धात पेपेच्या चुकीमुळे स्लोव्हेनियाला गोल करण्याच्या दोन संधी आयत्या चालून आल्या होता. पण, दोन्ही व्यर्थ गेल्या. सेस्कोची एक किक बाहेर गेली, तर दुसरी किक कोस्टाने शिताफीने अडवली.

Story img Loader