पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचे असंख्य चाहते आहेत. मैदानात त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. सोशल मीडियावरही रोनाल्डोचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या दिवसेगणिक वाढतच आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर त्याने ३०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला. इन्स्टाग्रामच्या इतिहासात इतके फॉलोअर्स असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिला व्यक्ती ठरला आहे. रोनाल्डोचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर ५०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
रोनाल्डो २०२१ या वर्षात सोशल मीडियावरून सर्वाधिक पैसे कमवणारा खेळाडूही ठरला आहे. त्याने १२० मिलियन युएस डॉलर्सची कमाई केली आहे. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. तो एका पोस्टमधून २.२० कोटी रुपये कमवतो. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर १०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. १०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेला विराट पहिला आशियाई आणि भारतीय खेळाडू आहे. या यादीत रोनाल्डोनंतर ड्वेन ‘द रॉक’ जॉनसन याचा क्रमांक लागतो. त्याचे २४६ मिलियन फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
यूरो चषकात रोनाल्डोची जादू कायम आहे. पहिल्या सामन्यात दोन गोल झळकावत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. यूरो चषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याला मिळाला आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर एकूण १०६ गोल आहेत.
WTC Final: टीम इंडियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
यूरो चषक २०२० स्पर्धेत हंगेरीला पराभूत केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोच्या एका कृतीमुळे कोका कोलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. त्याने समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या बाटल्या हटवत पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.